महापालिकेतील सर्वच विभागांत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार
By Admin | Updated: May 7, 2015 00:10 IST2015-05-07T00:10:43+5:302015-05-07T00:10:43+5:30
महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागाच्या कामकाजाचा अनुभव यावा,..

महापालिकेतील सर्वच विभागांत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार
आयुक्तांचा निर्णय : कर्मचारी संघटनेच्या मागणीची पूर्तता
अमरावती : महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागाच्या कामकाजाचा अनुभव यावा, यासाठी सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाला कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यापूर्वी महापालिका कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी केली होती. महापालिका कर्मचारी संघटनेचे प्रल्हाद कोतवाल यांनी काही महिन्यांपूर्वी विभागनिहाय बदल्यांची मागणी आयुक्तांकडे केली होती.
सामान्य प्रशासन विभागाला कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे कळविले आहे. त्यानंतर विभागनिहाय बदल्यांचे प्रकरण आयुक्तांच्या पुढ्यात ठेवले जाईल. अद्याप माहिती मिळालेली नाही.
- विनायक औगड,
उपायुक्त, महापालिका.