अल्केश महल्ले यांचा दिल्ली येथे कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:15 IST2021-09-22T04:15:58+5:302021-09-22T04:15:58+5:30

चिखलदरा : तालुक्यातील गौरखेडा बाजार येथील माजी सरपंच तथा सरपंच सेवा महासंघाचे चिखलदरा तालुकाध्यक्ष यांनी अल्केश महल्ले यांनी गावात ...

Alkesh Mahalle honored with Coroner's Award in Delhi | अल्केश महल्ले यांचा दिल्ली येथे कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मान

अल्केश महल्ले यांचा दिल्ली येथे कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मान

चिखलदरा : तालुक्यातील गौरखेडा बाजार येथील माजी सरपंच तथा सरपंच सेवा महासंघाचे चिखलदरा तालुकाध्यक्ष यांनी अल्केश महल्ले यांनी गावात केलेली विकासकामे तसेच कोरोनाकाळात केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना या त्यांच्या विविध कामांची दखल घेऊन सुरेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना ‘सरपंच माझा - कोरोनायोद्ध - आदर्श सरपंच २०२१’ पुरस्कारस्वरूप ट्राॅफी व सन्मानचिन्ह देऊन सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यापूर्वी त्यांना लोकमत सरपंच अवाॅर्डने सर्वप्रथम सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या सरपंचांना केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच सेवा महासंघाचे राजाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, राज्य कोषाध्यक्ष सदाशिव ढेंगे, रामनाथ बोऱ्हाडे, डॉ. नंदुकुमार गोडगे हे व्यासपीठावर होते. राज्यातील सरपंच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Alkesh Mahalle honored with Coroner's Award in Delhi