दर्यापुरात निकृष्ट धान्य पुरवठ्याबाबत एल्गार
By Admin | Updated: April 8, 2016 00:14 IST2016-04-08T00:14:37+5:302016-04-08T00:14:37+5:30
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये मागील काही दिवसांपासून ....

दर्यापुरात निकृष्ट धान्य पुरवठ्याबाबत एल्गार
निवेदन : तहसीलवर धडकले गावकरी
दर्यापूर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये मागील काही दिवसांपासून अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा होत असल्यामुळे गोरगरीब रेशनकार्डधारकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
धान्य पुरवठा चांगल्या प्रतीचा करावा व धान्याची तपासणी करूनच धान्यपुरवठा करण्यात यावा, मागील काही दिवसांपासून केशरी कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद आहे. अशा कार्डधारकांना धान्याचा व रॉकेलचा पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा, असे निवेदन युवा एकता सामाजिक संघटनेचे स्नेहल अटोकार यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना दिले.
निवेदन सादर करतेवेळी कार्यकर्त्यांनी सडलेल्या गव्हापासून बनविलेल्या पोळ्या तहसीलदारांना दाखविण्यात आल्या. यावेळी संघटनेचे दत्ता कुंभारकर, घुरडे, पोटे, वानखडे, सूरज गावंडे, भूषण पलिमे, उमेश खडके, ऋषी खरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)