शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वनव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’

By admin | Updated: February 4, 2016 00:21 IST

यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने जंगलात हिरवळ फारच कमी आहे. तर दुसरीकडे फेब्रवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जंगलात वनवा लागण्याची दाट शक्यता आहे.

पाऊस अत्यल्प कोसळल्याचा परिणाम : फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूलअमरावती : यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने जंगलात हिरवळ फारच कमी आहे. तर दुसरीकडे फेब्रवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जंगलात वनवा लागण्याची दाट शक्यता आहे. परिणामी वनविभागाने वनवनव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’ घोषित केले आहे. सॅटेलाईटद्वारे वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.वनविभागाने आधुनिकतेची कास धरली असली असताना जंगलात लागणाऱ्या वनवन्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही आधुनिक पद्धतीचा अंगिकार केला नाही. त्यामुळे दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगीवर पांरपरिक पद्धतीने वनकर्मचारी जीव मुठीत घेऊन नियंत्रण मिळवित असल्याचे चित्र आहे. परंतु मनुष्यबळाचा वाणवा ही खरी समस्या वनवनवा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरु लागले आहे. मध्यंतरी दऱ्या, खोऱ्यात लागणाऱ्या जंगलातील आगीत मौल्यवान वनस्पती, वन्यपशू, दुर्मिळ वनौओषधी, झाडे खाक झाल्याचा घटना घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी दोन लाख हेक्टरच्या जवळपास जंगल जळून खाक होत असल्याची वनविभागाच्या दत्फरी नोंद आहे. विशेषत: तेंदूचे वृक्ष हे मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात वनवनव्यामुळे लाखो रुपयांचे तेंदू पाने जळून राखरांगोळी होतात, अशी माहिती आहे. मात्र कोकणमध्ये जंगल हे सदाहरित असल्यामुळे येथे वनव्याची भिती नाही. वनविभागाकडून वनवनव्याबाबत जनजागृती, प्रचार व प्रसार केला जातो. मात्र जंगलात वनवनव्यावर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळविण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य, सयंत्र, अग्निशमन वाहने आदींची व्यवस्था का केली जात नाही? हा सवाल यानिमित्त्याने उपस्थित होत आहे. जंगलात आग लागली की वनकर्मचारी हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून त्याने रात्रदिंवस आग विझविण्याचे काम करतात. हाच शिरस्ता वनविभागात अनेक वर्षांपासून कायम आहे. एकिकडे वनविभाग आधुनिकतेची कास धरल्याचा गवगवा करीत असताना वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, सयंत्राचा वापर का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. तप्त उन्हाळ्यात पानगळ झालेल्या पानांच्या घर्षणामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडतात. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचारी दिवस रात्र एक करतात. मात्र ही आग एवढी भयंकर असते की ती आटोक्यात आणणे हे वनकर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर राहते. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक होते. यंदा वनवनवा लागण्याचे प्रमुख कारण हे पावसाचे पाणी कमी पडले हाच निष्कर्ष वनविभागाचा आहे.आॅस्ट्रेलिया, चीनच्या धर्तीवर नियंत्रण असावेसमृद्ध जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आॅस्ट्रेलिया, मलेशिया व चीन या देशाने वनवनव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजना राज्याने देखील कराव्यात अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे. राज्यात वनवनव्यावर नियंत्रण करण्यासाठी वनकर्मचारी तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र जंगलात मोठी आग लागल्याची घटना घडली की ते नियंत्रण करणे अशक्य ठरते.यावर्षी जंगलात आग लागण्याची शक्यता अधिकयावर्षी पाऊस अत्यल्प पडल्यामुळे उन्हाळा जोरदार तापणार आहे. किंबहुना १ फेब्रुवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली आहे. पाऊस कमी पडल्याने जंगलात गवत देखील वाढले आहे. त्यामुळे जंगलात आग लागण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. वनवनव्याच्या पार्श्वभूमिवर अलर्ट करण्यात आले आहे.जंगलातील आग नियंत्रण करण्यासाठी वनविभाग सज्ज आहे. १५ फेब्रवारी ते जून या कालावधीत जंगलात जाळ रेषा तयार करण्यात येणार आहे. फायर वॉचमनच्या नियुक्त्या देखील झाल्या आहेत. आग नियंत्रणासाठी सयंत्र खरेदीची तरतूद असून ती तोकडी आहे.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.