दारुच्या नशेत पेटविला स्वत:सह शेजाऱ्याचाही संसार

By Admin | Updated: July 11, 2015 01:37 IST2015-07-11T01:37:56+5:302015-07-11T01:37:56+5:30

वडगाव फत्तेपूर येथे दारुच्या नशेत एका इसमाने स्वत:च्या घराला आग लावली. त्यात शेजारांच्या घराचीही राखरांगोळी झाली.

Alcoholism dries up with self-neighborly world | दारुच्या नशेत पेटविला स्वत:सह शेजाऱ्याचाही संसार

दारुच्या नशेत पेटविला स्वत:सह शेजाऱ्याचाही संसार

राखरांगोळी : आरोपीला अटक, वडगाव फत्तेपूर येथील घटना
नरेंद्र जावरे अचलपूर
वडगाव फत्तेपूर येथे दारुच्या नशेत एका इसमाने स्वत:च्या घराला आग लावली. त्यात शेजारांच्या घराचीही राखरांगोळी झाली. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता सदर घटना झोपडपट्टी परिसरात घडली. एका म्हातारीच्या ओरडण्याने जीवित हानी टळली. घर पेटविणाऱ्या सुनील वाल्मिकराव नानवटकर (३०) यास परतवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
वडगाव फत्तेपूर येथील झोपडपट्टी परिसरात मंगेश श्रीकृष्ण इंगळे (३२) व आरोपी सुनील नानवटकर (रा. कोटंबा, यवतमाळ ह.मू. वडगाव फत्तेपूर) यांचे कुडामातीचे घरे आहे. अनेक वर्षांपासून ते शेतमजुरीची कामे करतात. आरोपी सुनील वाल्मिकराव नानवटकर याला दारुचे व्यसन आहे. नेहमी प्रमाणे तो गुरुवारी दारु पिऊन घरी आला. यातच पती-पत्नीमध्ये वाद झाला. पतीच्या अर्वाच्य बोलण्यामुळे रात्री कंटाळलेली पत्नी अनिता हिने तिचा भाऊ गजानन व आईला बोलावून ती तिच्या आईच्या घरी निघून गेली. दारुच्या नशेत असलेल्या गजाननला त्यांनी घरात कोंडून दिले होते. त्याच्या या नेहमीच्या धमक्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गजानने स्वत:च्या घराला आग लावली. त्याच्या या कृत्याची तक्रार करण्यासीठी पत्नी, मेहुणा, सासू, परतवाडा पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते.

म्हातारीने केला आरडाओरडा
गुरुवारी मध्यरात्री अचानक दोन घरे धगधग पेटत असल्याचे दिसताच याच झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सीताबाईला दिसले आणि तिने क्षणाचाही विलंब न होऊ देता आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.

-तर सिलिंडरचा स्फोट झाला असता?
दोन्ही घराला लागलेल्या आगीत घरगुती साहित्याची राखरांगोेळी झाली असताना स्वयंपाकासाठी लागणारे सिलिंडर पेटत्या घरातच होते. उपस्थितांच्या समयसुचकतेने ते बाहेर काढण्यात आले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

पेटत्या घरातून
घेतल्या उड्या
गजानन नानवटकर याच्या नेहमीच्या प्रकाराला परिसरातील नागरिक कंटाळले असले तरी त्याचे शेजारी मंगेश श्रीकृष्ण इंगळे यांचे घर आहे. गजाननने स्वत:च्या घराला आग लावली तेव्हा श्रीकृष्ण इंगळे पत्नी शीतल त्यांचा एक मुलगा व एक मुलगी घरात गाढ झोपेत होते. अचानक घराला रात्री १२वाजता आग लागल्याने पेटत्या घरातून इंगळे कुटुंबीयांनी जीव वाचविण्यासाठी पेटत्या आगीतून उड्या घेऊन कशीबशी सुटका केली.

Web Title: Alcoholism dries up with self-neighborly world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.