मद्यपीची गोपालनगरात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:17 IST2021-08-28T04:17:44+5:302021-08-28T04:17:44+5:30

अमरावती : एका मद्यधुंद इसमाने गोपालनगर परिसरातील १० ते १२ दुकानांची तोडफोड केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास ही ...

Alcohol vandalism in Gopalnagar | मद्यपीची गोपालनगरात तोडफोड

मद्यपीची गोपालनगरात तोडफोड

अमरावती : एका मद्यधुंद इसमाने गोपालनगर परिसरातील १० ते १२ दुकानांची तोडफोड केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी त्या मद्यपीला अटक केली. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतरही त्याला शुध्द नव्हती. विनोद नारायण चव्हान (४२, ज्योती कॉलनी) असे अटक आरोपीने नाव आहे.

डीमार्ट समोरून रेल्वे फाटकापुढून गोपालनगर जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. त्यातील नितीन लढ्ढा यांचे मेडिकल, गजानन गोमासे यांचे पान सेंटर, संजय आजनकर यांचे हेअर कटिंग सलून, घोटकर यांची दूध डेअरी, रवींद्र राऊत यांचे ब्युटी कलेक्शन, शाम निकम यांचे मोबाईल दुकान व इलेक्ट्रिकल्स दुकानात आरोपीने विनोदने हातात सत्तुरसारखे शस्त्र घेऊन काचांची व अन्य साहित्याची तोडफोड केली. तो त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्या दुकानदारांनी राजापेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला ताब्यात घेतले. १० ते १२ दुकानदार राजापेठ पोलीस ठाण्यात आले. तेथे ठाणेदार मनीष ठाकरे यांना त्यांनी आपबिती सांगितली. संबंधित दुकानदाराच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Alcohol vandalism in Gopalnagar