फ्रेजरपुऱ्यात तीन ठिकाणी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:36+5:302021-04-11T04:13:36+5:30

गजानननगर बिच्छुटेकडी हनुमान मंदिराजवळ केलेल्या कारवाईत ८,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी किरण दीपक खोडके(२२, रा. गजानगरनगर)विरुद्ध गुन्हा ...

Alcohol seized at three places in Frazerpur | फ्रेजरपुऱ्यात तीन ठिकाणी दारू जप्त

फ्रेजरपुऱ्यात तीन ठिकाणी दारू जप्त

गजानननगर बिच्छुटेकडी हनुमान मंदिराजवळ केलेल्या कारवाईत ८,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी किरण दीपक खोडके(२२, रा. गजानगरनगर)विरुद्ध गुन्हा नोंदविला. फ्रेजरपुरा परिसरात केलेल्या कारवाईत आरोपी मेहबुब पेरू बेनिवाले (४७, रा. फ्रेजरपुरा) याच्या ताब्यातून ४१६ तर आरोपी प्रतीक शहारे (२१, रा. यशोदानगर) याच्या ताब्यातून १०३० रुपयांची अवैध दारू जप्त केली. तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

बॉक्स:

गाडगेनगर पोलिसांनी दोन ठिकाणी पकडली दारु

गाडगेनगर पोलिसांनी सुद्धा आझादनगर व लक्ष्मीनगरातील मांडवा झोपडपट्टी येथे कारवाई करून अडीच हजाराची अवैध दारु जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

आझादनगरातील कारवाईत आरोपी सलीमाबी शाहीर हुसने (५३, रा. आझादनगर) हिच्या ताब्यातून १०८० रुपयाची तर लक्ष्मीनगरात करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी आकाश अरुण मेश्राम (२२, रा. लक्ष्मीनगर), राहुल रामेश्वर हरणे(३५, रा. लक्ष्मीनगर) याच्या ताब्यातून १६५० रूपयाची अवैध दारु जप्त केली. लॉकडाऊन असल्याचे शहरात अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असून पोलिसांची अशा आरोपीविरुद्ध नजर आहे.

Web Title: Alcohol seized at three places in Frazerpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.