पाचबंगला येथे दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:40+5:302021-03-15T04:13:40+5:30
अमरावती : बडनेरा पोलिसांनी बडनेरा जुनी वस्तीतील पाचबंगला परिसरात कारवाई करून ७५० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. ...

पाचबंगला येथे दारू जप्त
अमरावती : बडनेरा पोलिसांनी बडनेरा जुनी वस्तीतील पाचबंगला परिसरात कारवाई करून ७५० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
आरोपी शेख चांद शेख बशीर (५०, रा. जुनी वस्ती, बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------
बडनेरा येथे अवैध दारू पकडली
अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील नवीन पोटरचाळ पाचबंगला येथे कारवाई करून ५५० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. आरोपी भय्यालाल सुखई चपरीया (४५, रा. नवीन पोटर चाळ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------
वीज कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा
अमरावती : विद्युत बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याकरिता गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.