तिवसा खविसंच्या अध्यक्षपदी अळसपुरे

By Admin | Updated: May 20, 2016 00:18 IST2016-05-20T00:18:41+5:302016-05-20T00:18:41+5:30

सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. भा.पं.दे. तिवसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या

Alasapure as president of Tiwas Khavis | तिवसा खविसंच्या अध्यक्षपदी अळसपुरे

तिवसा खविसंच्या अध्यक्षपदी अळसपुरे

निवडणूक अविरोध : ठाकूर गटाचे वर्चस्व
तिवसा : सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. भा.पं.दे. तिवसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदावर भारवाडी येथील गजानन अळसपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुरेश धवने व मानद सचिवपदी मिलिंद काळमेघ यांचीही बिनविरोध वर्णी लागली असून पुन्हा एकदा खरेदी-विक्री संघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवण्यात माजी आमदार भैयासाहेब ठाकूर व आमदार यशोमती ठाकूर यांना यश प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच तिवसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्रीची निवडणूक येथे पार पडली होती. ज्यामध्ये सर्वच्या सर्वच १५ ही जागांवर ठाकूर गटाचे उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत एकहाती विजय मिळविण्यात आल्यानंतर सर्वांचे लक्ष अध्यक्षपदाच्या निवडीवर लागले होते. यासाठी बुधवारी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ही सर्व निवडणूक प्रक्रियार पार पडली.
यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिव अशा तीन पदांसाठी तिघांनीच अर्ज सादर केले होते. होऊ घातलेल्या या तीनही पदांची निवडणूक ही बिनविरोध पार पडणार हे निश्चित असताना आज येथे खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्षपदावर गजानन अळसपुरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी प्रमोद धवने यांचा अर्ज आला असता त्यांचीही त्याच पदावर बिनविरोध तर मानद सचिव पदासाठी मिलिंद काळमेघ यांचा अर्ज प्राप्त होताच तेथेही त्यांचीच बिनविरोध निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
यावेळी खविसंचे नवनियुक्त संचालक राजेश चौधरी, राजेश राऊत, आशिष बायस्कर, कैलास कंठाळे, शरद देशमुख, अविनाश काळे, रवींद्र हांडे, नंदकिशोर गोहत्रे, रामभाऊ बोकडे, दिलीप वानखडे, चित्रलेखा खारकर, विजया माहुरे, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, सुरेश साबळे, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, मुकुंद देशमुख, रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, तु. का. भोयर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडणूक प्रक्रिया सहायक निबंधक अनिरुद्ध राऊत, यू.जी. जिकाटे यांनी शिस्तबद्धरीत्या पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Alasapure as president of Tiwas Khavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.