अकोल्याची वाहतूक दर्यापूर मार्गे वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST2020-12-29T04:11:21+5:302020-12-29T04:11:21+5:30

------------------------------------------------------ वलगावात रस्त्यावर अतिक्रमण अमरावती: वलगाव येथील नवीन तसेच जुन्या बस स्थानक चौकात अतिक्रमण वाढले आहे. फळविक्रेते व भाजीपाला ...

Akola traffic diverted via Daryapur | अकोल्याची वाहतूक दर्यापूर मार्गे वळली

अकोल्याची वाहतूक दर्यापूर मार्गे वळली

------------------------------------------------------

वलगावात रस्त्यावर अतिक्रमण

अमरावती: वलगाव येथील नवीन तसेच जुन्या बस स्थानक चौकात अतिक्रमण वाढले आहे. फळविक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांनी रस्ता व्यापल्यामुळे येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. पोलिसांनी व ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

----------------------------------------------------------

शिवटेकडीजवळ ज्यूस विक्रेत्यांचे अतिक्रमण

अमरावती : मध्यवर्ती आगाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच शिवटेकडीजवळील फुटपाथवर अनेक ज्यूस विक्रेत्यांनी व्यवसाय थाटला असून, हातगाड्या फुटपाथवर ठेवण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांना जाण्यासाठी फुटपाथ राहिली नाही. त्यामुळे त्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघात नाकारता येत नाही. महापालिका व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

-------------------------------------------------------------

भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण

अमरावती : गाडगेनगर ते शेगाव नाक्यापर्यंत भाजीविक्रेते, फळविक्रेता तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी आपले व्यवसाय थाटले असून, यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण निर्मूलन पथक कधी-कधी कारवाई करते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते.

Web Title: Akola traffic diverted via Daryapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.