-अखेर नगरपंचायतींना मिळाले मुख्याधिकारी
By Admin | Updated: December 5, 2015 00:15 IST2015-12-05T00:15:27+5:302015-12-05T00:15:27+5:30
जिल्ह्यातील चार नवनिर्मित नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३० नोव्हेंबरला पार पडली.

-अखेर नगरपंचायतींना मिळाले मुख्याधिकारी
अमरावती : जिल्ह्यातील चार नवनिर्मित नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३० नोव्हेंबरला पार पडली. तेव्हापासून प्रशासकीय राजवट संपुष्टात आली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नव्हती. ‘लोकमत’ने नागरिकांची व्यथा लोकदरबारात मांडली. अखेर गुरुवारी उशिरा या चारही नगरपंचायतींना मुख्याधिकारी मिळालेत.
भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या मुख्यालयी एप्रिल महिन्यात नगरपंचायती स्थापन करण्यात आल्यात. या नगरपंचायतींवर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय राजवटीच्या सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे नगर विकास विभागाचे आदेश होते.
अन्य मुख्याधिकाऱ्यांना प्रभार
अमरावती : त्यानुषंगाने १ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक व ३० नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. निवडणुकीनंतर नगरपंचायतींमधील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली नव्हती किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे प्रभारदेखील सोपविला नव्हता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायतींचा कारभार अधांतरी होता. गुरुवारी उशिरा न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार सोपविला आहे.