‘आकांत’ने पटकावला महापौर चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:03+5:302020-12-30T04:17:03+5:30

‘लेखकाचा कुत्रा’ एकांकिकेने नाट्य पडदा उघडला, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे आयोजन अमरावती : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा ...

‘Akant’ won the Mayor’s Cup | ‘आकांत’ने पटकावला महापौर चषक

‘आकांत’ने पटकावला महापौर चषक

‘लेखकाचा कुत्रा’ एकांकिकेने नाट्य पडदा उघडला, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे आयोजन

अमरावती : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उघडला. अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरावती शाखा आणि महानगरपालिका यांच्यावतीने अमरावती येथील टाऊन हॉलमध्ये पार पडलेल्या महापौर चषक एकांकिका स्पर्धेत चांदूर रेल्वेच्या पीपल्स कला मंचच्या ''लेखकाचा कुत्रा'' या एकांकिकेचा प्रयोग लॉकडाऊननंतरचा पहिला प्रयोग ठरला. माही मानव विकास संस्थेच्या ‘आकांत’ या एकांकिकेने स्पर्धेत उत्कृष्ट निर्मिताचा प्रथम पुरस्कार पटकावला. कोरोना नियमावलींचे पालन करीत नाट्यरसिकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये २६ व २७ डिसेंबर रोजी महापौर चषक एकांकिका स्पर्धेत पुणे, नागपूर, चांदूर रेल्वे, तिवसा आणि अमरावती येथील एकंदर १० संस्थांनी एकांकिका सादर केल्यात.

रविवारी परीक्षक राजाभाऊ मोरे, संजय दखणे आणि संजीवनी पुरोहित यांनी निकाल जाहीर केला.

‘आकांत’ एकांकिकेने उत्कृष्ट निर्मितीसाठी महापौर चषक आणि रोख १५ हजारांचे प्रथम बक्षीस पटकावले. याच एकांकिकेच्या दिग्दर्शनासाठी अजय इंगळे, अभिनय (पुरुष) साठी वैभव ओगले यांना प्रथम पुरस्काराने तसेच रंगभूषेसाठी श्रेयस नाचणकर यांना सन्मानित करण्यात आले. महापौर चषक व रोख १० हजारांचे द्वितीय बक्षीस स्नेहस्मित (पुणे) यांनी सादर केलेल्या ‘अल्पविराम’ एकांकिकेने पटकावला. महापौर चषक व व रोख साडेसात हजारांचे तृतीय बक्षीस गंधर्व बहुउद्देशीय संस्था (अमरावती) च्या ‘अस्थिकलश’ या एकांकिकेला मिळाला. उत्तेजनार्थ रोख पाच हजारांचे बक्षीस

नागपूरच्या संताजी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘मुक्ताई’ एकांकिकेने पटकावला. अभिनय (पुरुष) साठी द्वितीय पुरस्कार प्रणव जोशी (अल्पविराम), तर उत्तेजनार्थ पुरस्कार अनुज ठाकरे (लेखकाचा कुत्रा) यांनी पटकावला. अभिनय (महिला) साठी धनश्री नागपूरकर ( मुक्ताई ) अनुराधा वाठोडकर ( शू ) हे पुरस्काराचे मानकरी ठरले. दिग्दर्शनासाठी द्वितीय पुरस्कार दीपक नांदगावकर (अस्थिकलश) यांनी पटकावला. शुभम मस्के (मुक्ताई) यांनी नेपथ्य, रोशन प्रजापती (उत्खनन) यांना पार्श्वसंगीत, दीपक नांदगावकर (अस्थिकलश) यांना प्रकाशयोजनेसाठी पुरस्कृत करण्यात आले.

माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेतील विरोधी पक्षनेता बबलू शेखावत आणि शिक्षण सभापती आशिष गावंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंचावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेचे उपाध्यक्ष प्रशांत देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी एम.टी. नाना देशमुख, गजानन संगेकर आणि सत्कारमूर्ती जनुभाऊ दातार उपस्थित होते. संचालक शाखाध्यक्ष चंद्रशेखर डोरले व आभार प्रदर्शन मिलिंद कहाळे यांनी केले.

Web Title: ‘Akant’ won the Mayor’s Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.