अजय लहानेंचे फर्मान, पत्रकारांना बाहेर काढा!
By Admin | Updated: December 29, 2014 23:34 IST2014-12-29T23:34:34+5:302014-12-29T23:34:34+5:30
बालगृहातून मुली हलविली जात असल्याची वार्ता पोहोचताच, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारांनी तपोवनकडे धाव घेतली. पत्रकारांना बघून संस्थेच्या संचालक पदावर असलेले शासकीय अधिकारी

अजय लहानेंचे फर्मान, पत्रकारांना बाहेर काढा!
म्हणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : 'यू आर नॉट परमिटेड हीयर'
अमरावती : बालगृहातून मुली हलविली जात असल्याची वार्ता पोहोचताच, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारांनी तपोवनकडे धाव घेतली. पत्रकारांना बघून संस्थेच्या संचालक पदावर असलेले शासकीय अधिकारी अजय लहाने यांचे माथे भडकले. पत्रकारांना बाहेर काढा, असे फर्मान त्यांनी सोडले. संस्थेच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या बुटले यांच्या हातून त्यांनी तसा निरोप धाडला. 'यू आर नॉट परमिटेड हीयर' अशा शब्दांत त्यांनी स्वत:ही हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचे स्पष्ट केले.
बाल कल्याण समितीची भेट घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास घोडके यांनी बोलविल्यानुसार, काही पत्रकार तपोवनात प्रविष्ट झालेत. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांशी घोडके यांनी औपचारीक परिचय करवून दिला. त्यानंतर बाल कल्याण समितीचे प्रमुख दिलीप काळे यांच्याशी चर्चा सुरू असताना अजय लहाने तेथे आलेत. बाल कल्याण समितीशी सुरू असलेली चर्चा त्यांना अस्वस्थ करून गेली. ते तपोवनाचे कार्यालय असलेल्या परिसरात परतले. तेथून त्यांनी संस्थेच्या सचिवपदाचा कारभार सांभाळणाऱ्या बुटले यांच्यामार्फत बाल कल्याण समितीशी चर्चा करणाऱ्या आणि अवतीभवती असलेल्या सर्व पत्रकारांना बाहेर काढण्याचे फर्मान सोडले. सदर निरोप घेऊन बुटले तेथे पोहोचले. न्यायाधीशांच्या क्षमतेत असलेल्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष काळे यांच्याशी सुरू असलेली चर्चा मध्येच रोखून बुटले यांनी लहानेंचा तोंडी आदेश बजावला. समितीचे अध्यक्ष काळेही हा प्रकार बघतच राहिले. बुटले यांच्या निरोपाचा मान राखून तेथील पत्रकार तपोवन कार्यालयाकडे रवाना झाले.