वैमानिक प्रशिक्षणासाठी विमानतळाची चाचपणी

By Admin | Updated: October 5, 2016 00:19 IST2016-10-05T00:19:28+5:302016-10-05T00:19:28+5:30

अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीने बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.

Airport checkout for aeronautical training | वैमानिक प्रशिक्षणासाठी विमानतळाची चाचपणी

वैमानिक प्रशिक्षणासाठी विमानतळाची चाचपणी

शासनाकडे प्रस्ताव : सीएई आॅक्सफोर्ड एव्हिएशन अकॅडमीच्या चमूचे सर्वेक्षण
अमरावती : अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीने बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याअनुषंगाने शनिवारी चमुने बेलोरा विमानतळाची चाचपणी केली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणे ही बाब स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी पूरक ठरेल.
विमानतळाच्या विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. वळण मार्ग निर्मितीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. आठ दिवसांत वळण रस्ता निर्मितीच्या कामाला प्रारंभ होईल, असे संकेत सूत्रांकडून मिळाले आहे. बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरु करण्याचा नवा प्रस्ताव आल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामी लागला आहे. शनिवारी बेलोरा विमानतळाचे सर्वेक्षण सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीचे विजय अहिरे, बेलोरा प्रबंधक एम.पी. पाठक आदींच्या नेतृत्वात करण्यात आले. गोंदिया येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी जागा अपुरी असल्याने सोईच्या विमानतळावरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय सीएई आॅक्सफोर्ड एव्हिअ‍ेशन अ‍ॅकेडमीने घेतला. बेलोरा विमानतळ हे वैमानिक प्रशिक्षणासाठी अतिशय सोयीचे असल्याचे मत सर्वेक्षणाअंती चमुने व्यक्त केले आहे. बेलोरा विमानतळाहून वैमानिक प्रशिक्षण देण्याची परवानगी मिळावी, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीक डे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १८ महिने कालावधीचे प्रशिक्षण वैमानिकांना मिळणार आहे.

‘‘ बेलोरा विमानतळाहून वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या चमुने भेट घेतली आहे. वैमानिक प्रशिक्षणामुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. ही बाब अमरावती जिल्ह्यासाठी अतिशय सुखद ठरणारी आहे.
- सुनील देशमुख,
आमदार, अमरावती

Web Title: Airport checkout for aeronautical training