शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघांवर 'एआय'ची नजर; पण ई-निविदा न राबविता थेट कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:40 IST

Amravati : 'मार्वल'च्या थेट सामंजस्य करारावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींचा खर्च, ३१५० एआय सक्षम कॅमेरे, नागरिकांना सतर्क करण्यासाठी लावणार सायरन, वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वन्यजीव आणि मानवसंघर्ष रोखण्यासाठी विदर्भातील व्याघ्रप्रकल्पांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. गावांच्या सीमेवर वाघ दिसताच एआय सक्षम कॅमेरे नागरिकांना अलर्ट देतील. हा प्रकल्प अत्याधुनिक असून वन्यप्राण्यांवर २४ तास थेट नजर ठेवण्यात येणार आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया न राबविता थेट 'मार्वल' कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याने एकूणच या प्रक्रियेत 'कुछ तो गडबड है' असा सूर वनविभागात उमटू लागला आहे.

नागपूर येथील नियोजन भवनात शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 'मार्वल' कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भातील पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा आणि नागपूर वन विभागातील गावांच्या सीमेवर एकूण ३१५० एआय सक्षम कॅमेरे आणि सायरन लावले जाणार आहेत. या प्रकल्पातून तूर्तास मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला वगळले आहे. हल्ली 'मार्वल' कंपनीचा एआय बेस प्रकल्प पोलिस तपासात वापरला जात असून, आता वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी तो उपयोगी आणला जात आहे. 

१० लाखांच्या खर्चाला ई-निविदा आवश्यक

  • साहित्य खरेदी, पुरवठा वा विकासकामे करताना ती रक्कम १० लाखांच्या वर असल्यास ई-निविदा प्रक्रिया राबविणे ही शासन नियमावली असल्याची माहिती एका तज्ज्ञांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
  • मात्र विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एआय सक्षम कॅमेरे आणि सायरन बसविण्याच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पात ही प्रक्रिया न राबविता 'मार्वल' कंपनीशी थेट सामंजस्य करार करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  • या करारात ना तांत्रिक (टेक्निकल) ना आर्थिक (फायनान्शियल) स्पर्धा झाली असून, थेट कंत्राटच देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

"ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकूण ९५ गावे असून २० गावांत सोलर सेट लावण्यात आले असून, त्याला एआय सक्षम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी जोडले आहे. चार गावांत ही प्रणाली लावण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता निधीची मागणी केली आहे. 'मार्वल' कंपनीला ही कामे सोपविली असून, ती राज्य सरकारने नेमली आहे."- प्रभुनाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती