शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

कृषी निविष्ठा परवान्यांचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:18 AM

बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने देण्याचा अधिकार जिल्हा परिषदांकडून काढून घेण्याच्या कृषी आयुक्तांच्या हालचालींवर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाचे धोरण : जिल्हा परिषदेचे अधिकार गोठविण्याच्या हालचाली

आॅनलाईन लोकमतअमरावती : बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने देण्याचा अधिकार जिल्हा परिषदांकडून काढून घेण्याच्या कृषी आयुक्तांच्या हालचालींवर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केवळ परवाने देण्याचे अधिकार न बदलता चुकांवर उपाय शोधावेत.ज्यांना कोणाला अधिकार देणार असतील, तेथेही माणसेच काम करतील. अधिकार कमी करून कृषी आयुक्तालय काय साध्य करणार आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.शुल्क शासनाच्या तिजोरीतकीटकनाशकांची विषबाधा होऊन जवळपास ३६ शेतकºयांनी जीव गमावल्यामुळे कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणाचा विषय ऐरणीवर आला. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी राजकारण्याच्या दबावाखाली काम करीत असल्याचे कारण पुढे करत यापुढे परवाने देण्याचे अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यासंबंधीचा प्रस्ताव कृषी सचिवांकडे सादर केला आहे. या पार्श्वभूनीवर परवाने देण्याचे अधिकार काढून घेतल्यास कामकाजात काय बदल होईल, याबाबत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी चाचपणी केली. जिल्हा परिषदांच्या कामकाजावर शंका घेणे योग्य नाही. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फतच हे परवाने दिले जात होते. जिल्ह्यात बियाणे, खते आणि कीटकनाशकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाचे २३ आणि जिल्हा परिषदेचे १७ कृषी निरीक्षक कार्यरत आहेत. शासन परवाने देण्याचे अधिकार काढून घेणार असेल तर जिल्ह्यातील कार्यरत कृषी निरीक्षकही काढून घेणार आहेत का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. परवाने देण्याचे अधिकार काढून घेण्याने कृषी विभागाचे काहीही नुकसान होणार नाही किंवा फायदाही होणार नाही. परवान्यासाठी लागणारे विहीत शुल्क हे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत नव्हे तर शासनाच्याच तिजोरीत जाते. दुसरीकडे गुणवत्ता नियंत्रणासाठी शासनाचे व जिपच्या निरीक्षकांनी सतर्क राहून अनियमितता आढळलेल्या विक्रेत्यांचे परवानेही रद्द केलेत. अधिकार बदलल्याने सुधारणा होत नसते, मानसिकता बदलल्याने परिणाम दिसून येतो, असे मत जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी व्यक्त केले जिल्हा परिषदेने यंदा केले २८ परवाने रद्दजिल्हा परिषद कृषी विभागाने अनियमितता आढळून आलेल्या विक्रेत्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील १०७३ परवानाधारक कीटकनाशक विक्रेत्यांपैकी १६ जणांचे परवाने निलंबित केले. बियाण्याच्या १२२६ विक्रेत्यांपैकी पाच आणि खतांच्या १३२६ विक्रेत्यांपैकी सात जणांचे परवाने रद्द करण्याची कारवाई जिल्हा परिषद कृषी विभागाने केली आहे. कृषी विभागाने ५५६ बियाणे, २६१ खत आणि १७३ कीटकनाशकाचे नमूने घेतले आहेत. या सर्व नमुन्यांमधून ३९ नमुने फेल ठरल्याने संबंधित कृषिसेवा केंद्र संचालक व उत्पादकांवर न्यायालयात खटले दाखल केल्याचे कृषी विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.कृषी विभागाकडे झेडपी स्थापनेपासूनच परवाने देण्याचे अधिकार आहेत. आता शासन हा अधिकार काढण्याच्या तयारीत आहे. याला आमचा तीव्र विरोध असून, यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून अधिकार कायम ठेवण्यासाठी आग्रह धरू.- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जिल्हा परिषद