शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

खारपाणपट्ट्यासाठी कृषी संजीवनी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:56 IST

लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडून आढावा : योेजनेस गती, ३५६ गावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या खारपाणपट्ट्यातील ३५६ गावांसह एकूण ५३२ गावे या योजनेत समाविष्ट आहेत. कृषी विभागाने या कामाला गती द्यावी, असे निर्देश शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिलेत.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सत्यजीत ठोसरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.या प्रकल्पातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकºयांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. यानुषंगाने शेतमालाच्या विपणनासाठी प्रभावी प्रयत्न करावेत.राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (ई-नाम) माध्यमातून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे ई-व्यवहाराद्वारे शेतमाल विक्रीला अनेकविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.त्याचप्रमाणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य व शेतकºयांपर्यंत विविध बाजारांतील दरांची माहिती वेळेत पोहचेल, अशी समन्वय यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिलेत.प्रकल्पाचे घटकक्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदींबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकºयांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकुल वाण आदी घटकांचा या प्रकल्तात समावेश आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्येशास्त्रीय निर्देशांंकाचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड, महसूल मंडळनिहाय उभारणी करण्यात येणाºया स्वयंचलित हवामान केंद्राकडून प्राप्त होणाºया माहितीस अनुसरून शेतकºयांना कृषी हवामान सल्ला, शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन, खारपाण पट्ट्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा हे जिल्हे तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका अशा ९३२ गावांचा समावेश आहे.प्रकल्पाची उद्दिष्टेहवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे.अल्प व अत्यल्प शेतकºयांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे.शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे.