कृषिसहायकांचा ऑनलाईन कामांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:05+5:302021-07-28T04:13:05+5:30
चांदूर रेल्वे : कृषिसहायकांना उदभवणाऱ्या विविध अडचणी शासनाकडून दुर्लक्षित करण्यात येत असल्याने त्यांनी ऑनलाईन कामांवर २३ जुलैपासून बहिष्कार टाकला ...

कृषिसहायकांचा ऑनलाईन कामांवर बहिष्कार
चांदूर रेल्वे : कृषिसहायकांना उदभवणाऱ्या विविध अडचणी शासनाकडून दुर्लक्षित करण्यात येत असल्याने त्यांनी ऑनलाईन कामांवर २३ जुलैपासून बहिष्कार टाकला आहे. याबाबत जिल्हा संघटनेमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कृषिसहायकाला डेटा खर्च दिला जावा. क्रॉपसॅप ॲपकरिता नियमानुसार देय रक्कम मिळावी. झेरॉक्स, टायपिंग, विविध आराखडे, सविस्तर अंदाजपत्रकासाठी खर्च उपविभागीय स्तरावरून देण्यात यावा. मूळ वेतनाच्या २५ टक्के जास्त वेतन मिळावे. अकृषक कामांकरिता वारंवार सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश थांबविण्यात यावे. कार्यालयात पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह उपलब्ध करावे. अतिरिक्त पदभाराकरिता देय विशेष वेतन मिळावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. निवेदन देतेवेळी दीपक पांडे, उपेंद्र इंगोले, राहुल चौधरी, योगेश नागपुरे, राहुल धांडे उपस्थित होते.
270721\img-20210725-wa0010.jpg
photo