एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली

By Admin | Updated: February 5, 2016 00:16 IST2016-02-05T00:16:58+5:302016-02-05T00:16:58+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरांच्या विरोधात ...

An agitator's condition worsened | एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली

एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली

उपोषणाचा तिसरा दिवस : इर्विनमध्ये दाखल
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरांच्या विरोधात एनएसयूआयने सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान गुरुवारी तुलसी खरडोंग या उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली. त्याला उपचाराकरिता इर्विन रुग्णालयात दाखल केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही विद्यापीठ प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही.
मंगळवारीपासून विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरच उपोषणाला सुरुवात केली. शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरा काही विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप एनएसयूआयने केला आहे. बेहरा यांना पदावरून हटवा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच शारीरिक शिक्षण विभागाने शोंधप्रबंध सक्तीचे करू नये, ते एच्छिक असावे, अशा विविध मागण्या केल्या आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भुयार यांच्या नेतृत्वात हिमांशू कुबडे, तुलसी खरडोंग, उमर जान शाह, मुजीद हुसेन मल्लीक, आरजीत हुसेन वार, रुगवेद सरोदे, केतन बारबुध्दे, नितीन ठाकरे उपोषणाला बसले आहेत. त्यातच बेहरा यांच्या चौकशीचा अहवाल सुध्दा गुलदस्त्यात असल्याचे दिसून आले आहे.
राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार गुरुवारी अमरावती दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन सोपविले. कुलगुरु खेडकर व विभागप्रमुख सच्चीदानंद बेहरा यांच्याविरोधात हे निवेदन होते.

चौकशी अहवाल कुलगुरुपर्यंत पोहचला नाही
शारीरिक शिक्षण विभागप्रमुख बेहरा यांची विद्यापीठ प्रशासनाने नेमलेल्या समितीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. समितीतील अधिष्ठाता एस. आर. माणिक यांनी काही विद्यार्थ्यांचे बयाण नोंदविले असून तो चौकशी अहवाल कुलगुरुंसमोर सादर करण्यात येणार होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो अहवाल कुलगुरुंसमक्ष सादर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी निर्णयाच्या प्रतीक्षेत होते.

Web Title: An agitator's condition worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.