बिझीलँड मार्केटमध्ये आंदोलन, भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:34+5:302021-04-11T04:13:34+5:30

00000000000000000000000 अंगावर श्वान सोडून कपडे फाडण्याची धमकी अमरावती : पोलीस संरक्षणात बाळ ताब्यात घेण्यासाठी सासरी गेलेल्या महिलेच्या अंगावर ...

Agitations in BJP market, crime against BJP office bearers | बिझीलँड मार्केटमध्ये आंदोलन, भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

बिझीलँड मार्केटमध्ये आंदोलन, भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

00000000000000000000000

अंगावर श्वान सोडून कपडे फाडण्याची धमकी

अमरावती : पोलीस संरक्षणात बाळ ताब्यात घेण्यासाठी सासरी गेलेल्या महिलेच्या अंगावर श्वान सोडून तिचे कपडे फाडण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शेगाव नाका परिसरात शुक्रवारी घडली. सहायक उपनिरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

0000000000000000000000

भीमनगरातून बोकडाची चोरी

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगरातून दहा हजार रुपये किमतीचे बोकड चोराने लंपास केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. एका महिलेने बकऱ्या व बोकड चराईसाठी भीमनगरात सोडले होते. यादरम्यान पप्पू भगत आणि त्याच्या एका मित्राने मोपेडद्वारे बोकड चोरून नेल्याची तक्रार महिलेने गाडगेनगर पोलिसांत नोंदविली.

00000000000000000000000000

गुलशन टाॅवरसमोरून दुचाकी लंपास

अमरावती : कोतवाली हद्दीतील गुलशन टाॅवरसमोरून एका तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. प्रवीण राधेश्याम मालानी (३५, रा. गणेश कॉलनी) याने एमएच २७ एएन ०३२० क्रमांकाची दुचाकी गुलशन टाॅवरसमोर उभी केली होती. काम आटोपून ते परतले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली.

0000000000000000000000000

शहरात दोघांचा आकस्मिक मृत्यू

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रुग्णांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सदानंद भिवसन राऊत (५६, रा. केवल कॉलनी) आणि शंकर गोमाजी गडमकर (५० रा. गवळीपुरा, अकोला) अशी मृतांची नावे आहेत. सदानंद राऊत व शंकर गडमकर यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: Agitations in BJP market, crime against BJP office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.