आजी-माजी नगरसेवकांचे खड्ड्यांत झोपून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:34 IST2018-07-11T22:33:41+5:302018-07-11T22:34:09+5:30
अमरावती-बडनेरा मुख्य मार्गाची साहील लॉनसमोर दैनावस्था झाली आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी खड्ड्यांतील पाण्यात झोपून आंदोलन केले व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.

आजी-माजी नगरसेवकांचे खड्ड्यांत झोपून आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती-बडनेरा मुख्य मार्गाची साहील लॉनसमोर दैनावस्था झाली आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी खड्ड्यांतील पाण्यात झोपून आंदोलन केले व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.
बडनेरापासून थोड्याच अंतरावर या ठिकाणी रस्ता खराब आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्थिती ‘जैसे थे’ आहे. तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे दिवसआड या ठिकाणी अपघात घडत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक जावेद मेमन अभिनव आंदोलन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंझाड, इम्रानसह इतरही लोक उपस्थित होते. उद्या शेकडो लोकांना घेऊन आंदोलन सुरू ठेवू, असा इशारा भाजप प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी साबांविच्या अधिकाऱ्यांना दिला.
प्रशासन झोपेतच
मुख्य मार्गावरील अर्ध्या किलोमीटरच्या टप्प्यात रस्ता आहे की नाही, अशी अवस्था आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अनेक अपघात खड्ड्यांमुळे घडलेत. असे असतानाही प्रशासन झोपेत आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील लक्ष देण्याची गरज आहे.
जीवघेण्या खड्ड्यांची दुरूस्ती प्रशासनाने तात्काळ करावी. नागरिक त्रस्त झाले आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येईल का? आंदोलन तीव्र करू.
- जावेद मेमन, माजी नगरसेवक