प्रहारचे आक्रमक आंदोलन
By Admin | Updated: June 20, 2015 00:48 IST2015-06-20T00:48:12+5:302015-06-20T00:48:12+5:30
प्रहारच्या आंदोलनामुळे भातकुली तहसिलचे गट सचिव निलंबित करण्यात येईल, ..

प्रहारचे आक्रमक आंदोलन
'बी अॅन्ड सी'त तोडफोड : उपनिबंधकास घेराव
अमरावती : प्रहारच्या आंदोलनामुळे भातकुली तहसिलचे गट सचिव निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात प्रहारच्या तोडफोड आंदोलनाने अधिकारी, कर्मचारी धास्तावले होते.
कामनापूर येथील रहिवासी शेतकरी विजय मुंडाले यांना भातकुली तहसिलमध्ये कर्ज प्रक्रियेत गटसचिव त्रास देत आहेत. परिणामी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहारने जिल्हा उपनिबंधकांना घेराव घालून केली होती. आमदार बच्चू कडू यांनी प्रहार स्टाईलने हिसका दाखविताच अधिकारी जागेवर आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोर्चा वळविला. वलगाव येथील पुलाच्या निर्माण कार्यात होणारे विलंब व अन्य ठिकाणी सुरु असलेल्या अर्धवट विकास कामामुळे नागरिकांवर प्राण गमाविण्याची वेळ येत असल्याचा आरोप केला. यावेळी छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, भारत उगले आदी उपस्थित होते.