जिल्ह्यात २ हजार २६५ मतदारांचे वय शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:01+5:302021-02-05T05:25:01+5:30

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध अमरावती : जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, या यादीत १०० वर्षांपेक्षा जास्त वय ...

The age of 2 thousand 265 voters in the district is over 100 | जिल्ह्यात २ हजार २६५ मतदारांचे वय शंभरी पार

जिल्ह्यात २ हजार २६५ मतदारांचे वय शंभरी पार

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

अमरावती : जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, या यादीत १०० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आठ विधानसभा मतदारसंघांतील २ हजार २६५ मतदारांचा समावेश आहे.

प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील मतदार यादी अद्ययावत केली जाते. त्यासाठी ठरावीक कार्यक्रम आखला जातो. यावर्षीही मतदार यादीचे पुनर्निरीक्षण पूर्ण झाले असून, नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदारांना नोंदणीची जशी उत्सुकता असते, शंभर वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांचे मतदार यादीतील महत्त्वही तेवढेच आहे. लोकशाही सुदृढ करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या या ज्येष्ठ मतदारांनी वेळोवेळी आपला लोकप्रतिनिधी निवडला आहे. त्यांच्या अनुभवातून नवीन मतदार जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतात. जिल्ह्यात १०० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले २२६५ मतदार असून, या मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न पुढील पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरणार आहेत. मतदारांच्या संख्येत वाढ होत असली तरी निवडणुकांमध्ये मतदान टक्केवारीत संथगतीने वाढ होत आहे.

बॉक्स

२८ हजारांवर नवमतदार

१) मतदार यादीत नवीन मतदारांना नोंदणीसाठी उद्युक्त केले जाते. निवडणुकांमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या मतदारांच्या माध्यमातून देशाचा, राज्याचा प्रतिनिधी निवडला जातो. या मतदारांची विचारसरणी, बदललेल्या समस्या आणि काम करण्याची पद्धत यानुसार राज्यकर्त्यांना वेळोवेळी स्वत:त बदल करणे क्रमप्राप्त ठरते.

२) जिल्ह्यात यंदाच्या मतदार यादीत २८ हजार ३३६ नवमतदारांचा समावेश झालेला आहे. १८ ते १९ वर्षे वयोगटातील हे मतदार असून, यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात सर्वाधिक ५ हजार ६७५ नवमतदारांचा समावेश झाला आहे. याशिवाय बडेनरा मतदारसंघात २७२७, अमरावती ३१९२, तिवसा २९९५, दर्यापूर ४५०४, मेळघाट २३९३, अचलपूर ३८५३ व मोर्शी मतदारसंघात २९९७ जणांचा नव्याने मतदारयादीत समावेश झाला.

बॉक्स

मतदारसंघनिहाय शंभरी पार मतदार

अमरावती ३७६, बडनेरा ५००, दर्यापूर १७९, अचलपूर १८७, मेळघाट २४०, मोर्शी २४६, तिवसा ३०८, धामणगाव रेल्वे २२९

बॉक्स

जिल्ह्यातील मतदार

२४६१८८७

पुरुष मतदार १२६४८५०

महिला मतदार ११९६९९८

Web Title: The age of 2 thousand 265 voters in the district is over 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.