विटाळ्यात पुन्हा गावठी दारूवर धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:20+5:30
विटाळा गावीनजीक नदीच्या पात्रात अवैध गावठी दारू गाळण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर येथील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीमच जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या उपस्थितीत मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे व राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक अनिस शेख यांच्या उपस्थितीत वर्धा नदीकाठावरील दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

विटाळ्यात पुन्हा गावठी दारूवर धाडसत्र
धामणगाव रेल्वे/मंगरूळ दस्तगीर : अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्याच्या मध्यंतरी असलेल्या विटाळा येथील वर्धा नदीच्या परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवारीदेखील पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरसीपी यांच्या पथकाने कारवाई करीत २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला होता.
विटाळा गावीनजीक नदीच्या पात्रात अवैध गावठी दारू गाळण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर येथील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहीमच जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या उपस्थितीत मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे व राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक अनिस शेख यांच्या उपस्थितीत वर्धा नदीकाठावरील दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. वर्धा नदीपात्रात पाट वाहिले एवढे प्रमाण या दारूचे होते. २३ ड्रम मोहा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य, गावरान मोहाची दारू, असा तब्बल २ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत ठाणेदार श्याम वानखडे, दुय्यम ठाणेदार विश्वास वानखडे, सहायक फौजदार साहेबराव ठावरे, विनोद राठोड, पवन हजारे, भूषण चंदेल, सुनीता दौंड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अनिस शेख, सरपंच मंगेश ठाकरे, उपसरपंच नितीन वाघाडे, पोलीस पाटील बाबूराव डाहे तसेच तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर येथील पोलीस पथक व आरपीसी पथक कारवाईत सहभागी झाले होते. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याबाबत येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.