पुन्हा १६ खात्यांतून रकमेची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:53 IST2017-10-30T23:53:22+5:302017-10-30T23:53:49+5:30

येथील बँक आॅफ महाराष्टÑच्या शाखेमधून पैशांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Again theft of money from 16 accounts | पुन्हा १६ खात्यांतून रकमेची चोरी

पुन्हा १६ खात्यांतून रकमेची चोरी

ठळक मुद्देबँक आॅफ महाराष्ट्रतही पैसे असुरक्षित

मनोहर सुने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरजगाव कसबा : येथील बँक आॅफ महाराष्टÑच्या शाखेमधून पैशांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकºयाच्या खात्यातून चार टप्प्यात रक्कम हडपण्यात आली. अशा तब्बल १६ तक्रारी बँकेकडे आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
शिरजगाव कसबा येथील प्रभाकर देऊळकर यांचे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये पती-पत्नीचे संयुक्त खाते आहे. ते मजुरांना पैसे देण्यासाठी बँकेत पैसे काढण्यास गेले असता खात्यात केवळ ८८८ रुपयेच शिल्लक अल्याचे समजले. त्यांच्या खात्यातून मार्चपासून चार टप्प्यांत ७० हजार रुपये काढल्याची नोंद आहे. असाच प्रकार मनकर्णा पांडुरंग वाघमारे (रा. पिंपरी) या महिलेसोबत झाला. त्यांच्या खात्यात मे महिन्यात घरकुलाचे ३५ हजार रुपये जमा झाले. ती रक्कम दोनवेळा १५ हजार व ५ हजार अशी काढण्यात आली. यासंदर्भात बँक व्यवस्थापकाशी चर्चा केली असता अशा १६ तक्रारी आल्याचे ते म्हणाले.
अशा खात्यातून रकमेची चोरी
शिरजाव कसबा येथील बँक आॅफ महाराष्टÑ शाखेत थूगाव, पिंपरी, देऊरवाडा, सर्फापूर, कारंजा, बहिरम, रतनापूरच्या शेतकरी, मजुर व नागरिकांचे खाते आहेत. ज्यांना विड्रॉल स्लिप भरता येत नाही, स्वाक्षरी करता येत नाही, अशा खात्यातून रक्कम काढली गेली.
विड्रॉल फक्त २० हजारांचे
शिरजगाव कसबा शाखेमध्ये २० हजार रुपयांचे विड्रॉल देण्याचे अधिकार रोखपालाला दिलेले आहेत. रक्कमेची देवाण-घेवाण रोखपाल सदाशिव दाईत यांच्या अधिकारात झाली आहे. या हेराफेरीत कंत्राटी कर्मचारी दीपक पुरी याचाही सहभाग असावा, असा संशय बळावला आहे.

या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना देण्यात आली आहे. ते बँकेत आले असून चौकशी करीत आहेत. खात्यातून रक्कम परस्पर गहाळ झाली किंवा काढल्या गेली, अशा खातेदारांनी बँक पासबुक , आधारकार्ड, झेरॉक्स व तक्रार अर्ज शाखेमध्ये द्यावा.
- राजेंद्र वानखडे, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, शिरजगाव कसबा

Web Title: Again theft of money from 16 accounts