पुन्हा सहा मृत्यू, ३७९ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:26+5:302021-03-16T04:14:26+5:30
अमरावती : कोरोना रुग्णसंख्येत कमी येत असताना मृत्यूचे सत्र मात्र, सुरूच असल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सोमवारी पुन्हा सहा ...

पुन्हा सहा मृत्यू, ३७९ अहवाल पॉझिटिव्ह
अमरावती : कोरोना रुग्णसंख्येत कमी येत असताना मृत्यूचे सत्र मात्र, सुरूच असल्याने जिल्ह्यात चिंता वाढली आहे. सोमवारी पुन्हा सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्यूसंख्या ६०५ झाली आहे. सोमवारी ३७९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४२,८७६ झालेली आहे.
सद्यस्थितीत चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण तीन दिवसांत कमी झालेले आहे. सोमवारी २,९३३ चाचण्या करण्यात आल्या. यात १२.९२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. रविवारी १४ टक्केच पॉझिटिव्हिटी होती. सुपर स्प्रेडरला लॉकडाऊनमध्ये झालेला अटकाव तसेच व्यापारी, आस्थापना यासह नागरिकांसाठी हॉटस्पॉटमध्ये चाचणी शिबिर घेण्यात येत आहे. याचा आता सकारात्मक परिणाम दिसू लागलेला आहे.
याशिवाय अलीकडे चाचण्यांची संख्यावाढ करण्यात आली. याशिवाय ‘होम आयसोलेटेड रुग्णांची पाहणी पथकांद्वारा करण्यात आली. यात जे रुग्ण घरी आढळले नाहीत, त्यांच्यावर प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून या रुग्णांशी नियमित संपर्क केला जात असल्यानेही त्यांच्यावर ‘वॉच‘ राहिला. परिणामी चार दिवसांत रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
सोमवारी सहा मृत्यू
००००००००००
००००००००००००००