पुन्हा चार : कोरोना शंभरीकडे, एकूण ९४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:14+5:30
वरूड येथील ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ती यापूर्वीच्या वरूड येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या ‘त्या’ महिलेची मैत्रिण असल्याची माहिती आहे. आता वरूड येथे कोरोनाग्रस्तांची संख्या ३ झाली आहे. ती महिला हल्ली क्वारंटाईन आहे. लालखडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती व्यक्ती सारी आजाराच्या उपचारासाठी सुपर स्पेशालिटीत दाखल होती. आता संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पुन्हा चार : कोरोना शंभरीकडे, एकूण ९४
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. शुक्रवारी तीन महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आल्याने कोरोना ग्रस्तांची संख्या आता ९४ वर पोहोचली आहे. दरदिवशी वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या बघता आता अमरावतीची शंभरीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. येथील उत्तमनगरात पहिल्यांदाच ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर महापालिकेने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे.
वरूड येथील ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ती यापूर्वीच्या वरूड येथील पॉझिटिव्ह आढळलेल्या ‘त्या’ महिलेची मैत्रिण असल्याची माहिती आहे. आता वरूड येथे कोरोनाग्रस्तांची संख्या ३ झाली आहे. ती महिला हल्ली क्वारंटाईन आहे. लालखडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ती व्यक्ती सारी आजाराच्या उपचारासाठी सुपर स्पेशालिटीत दाखल होती. आता संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
स्थानिक मसानगंज येथील ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेने १३ मे रोजी येथील खासगी डॉक्टरकडे ताप असल्यामुळे उपचार घेतला. मात्र, या महिलेला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे होती. त्यामुळे त्या खासगी डॉक्टरने त्यांना इर्विन रुग्णालयात पाठविले होते. तेथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांना कोविड रुग्णालयात हलविले आहे. आता मसानगंजमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ झाली आहे.
- उत्तमनगर येथील ४२ वर्षीय महिला ही पीडीएमसीमध्ये सफाई कामगार असल्याची माहिती आहे. त्यांना कोविड रुग्णालयात हलविले आहे. त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध, स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य यंत्रणेने चालविली आहे. ७ दिवसांपूर्वी एक व्यक्ती पीडीएमसीमध्ये उपचारासाठी आली होती. नंतर ती व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्या व्यक्तीच्या संपर्कातील सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रबोधिनीमध्ये क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. यात ती महिलासुद्धा होती, अशी माहिती आहे. पहिल्यांदाच उत्तरनगर भागात कोराना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. या परिसरात नागरिकांच्या आरोग्य तपासणीला गती येणार आहे. हा भाग सॅनिटाईझ करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
लालखडी सिटीझन शाळा परिसर कंटेनमेंट झोन
महापालिका हद्दीतील लालखडी सिटीझन शाळेजवळील परिसर कोराना बाधित रूग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. या भागात जाणारे मार्ग बंद झाले असून, सीमा सील केल्या आहेत. रेल्वे लाईनवरील उच्च दाब वीज वाहिनी, सरकार पॅलेस, गेट, रिंग रोड, म्हशीचा तबेल्यापासून ते उच्च दाब वीज वाहिनीपर्यंत, सिटीझन शाळेमागील नाली रेल्वे लाईन ते उच्च दाब वीज वाहिनीपर्यंत सीमा सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी निर्गमित केले.