पुन्हा ६३ अहवाल पॅझिटिव्ह (सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST2020-12-28T04:08:30+5:302020-12-28T04:08:30+5:30

----------------- एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू अमरावती : जिल्ह्यात २४ तासांच्या उपचारादरम्यान देशपांडेवाडी, पन्नालालनगरातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ...

Again 63 report positive (summary) | पुन्हा ६३ अहवाल पॅझिटिव्ह (सारांश)

पुन्हा ६३ अहवाल पॅझिटिव्ह (सारांश)

-----------------

एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांच्या उपचारादरम्यान देशपांडेवाडी, पन्नालालनगरातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ३९६ वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत २ टक्के आहे.

-----------------

रविवारी ६४ रुग्णांना डिस्चार्ज

अमरावती : उपचारादरम्यान बरे वाटल्याने रविवारी ६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमणमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८,५६९ वर पोहोचली आहे, हे प्रमाण उच्चांकी ९५.७४ टक्के आहे.

-------------------------------

गृह विलगीकरणात २५४ रुग्ण

अमरावती : जिल्ह्यात गृह विलगीकरणात सद्यस्थितीत २५४ रुग्ण आहेत. यात महापालिका क्षेत्रात ७५, तर ग्रामीण भागात १७९ रुग्ण सुविधेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत गृह विलगीकरणातील ४,१४४ व्यक्तींनी या सुविधेचा लाभ घेतला. यात महापालिका क्षेत्रातील २,६२९ तर ग्रामीणमधील १,५१५ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Again 63 report positive (summary)