शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

जिल्ह्यात आगडोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 01:02 IST

शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले.

ठळक मुद्देकोट्यवधीचा माल खाक। प्रशासनाकडून आगीबाबत दक्षता घेण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयापासून २५ मीटर अंतरावर उभ्या ट्रॅव्हल्सला शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आग लागली, तर शनिवारी दुपारी नांदगाव पेठ हद्दीतील सावर्डी स्थित एमआयडीसी परिसरात एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली. तिसरी घटना भाजीबाजार परिसरात घडली. एका इमारतीवरील मोबाइल टॉवरजवळील जनरेटरला आग लागली. या तिन्ही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले.शॉर्ट सर्कीटने ट्रॅव्हल्सला आगपंचवटी ते वेलकम टी-पॉइंट दरम्यान रोडवर उभ्या ट्रॅव्हल्सला शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आग लागली. यामध्ये ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २७ डी ३९११ जळून खाक झाली. घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पाचारण केले. अग्निशमनने वेळेवर पोहोचवून आग आटोक्यात आणली. त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स पार्किंगची जागा नसतानाही तेथे ट्रॅव्हल्स उभी करण्यात आली होती. यापूर्वी शहरात तीन ट्रॅव्हल्स बसला अज्ञाताने आग लावली होती. त्यापूर्वी कॅम्प मार्गावरील हॉटेल महफीलसमोर तीन कार जळून खाक झाल्या होत्या. या चार महिन्यांत वाहनांना आगी लागल्याच्या घटना सर्वाधिक घडल्याचे स्पष्ट होत आहे.प्लास्टिक कारखान्यानाला आगसावर्डीजवळील बालाजी प्लास्टिक कंपनीला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमनला मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ तीन पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनला जवानांना तब्बल तीन तास अथक परिश्रम घ्यावे लागले. आगीत मोठा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.भाजीबाजार परिसरात जनरेटर भडकलेभाजीबाजार परिसरातील श्री रामचंद्र निवास या सदनिकेवर असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरला शनिवारी दुपारी १.३० वाजता आग लागली. घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन सैय्यद अनवर, फायरमन चंद्रकात सूर्यवंशी, दिलीप चौखंडे, अंबाडकर, मकवाने व वाहनचालक अमिन शेख, राजू शेंडे, इम्रान खान, यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे तेथील रहिवासी असलेले १२ कुटुंब धास्तावले होते.अग्निशमन दलाने तिसºया माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहणाºया नागरिकांना घर रिकामे करायला लावले. सिलिंडर बाहेर काढले. दोन तासांनी आग विझली. राजेश गोयनका यांनी २००५ मध्ये सदनिका निर्माण झाले. सदनिकेवर मोबाइल टॉवरला नागरिकांनी विरोध केला होता.वीजतारांच्या स्पर्शाने टिप्पर खाकघुईखेड : चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाºया टिप्परला जिवंत वीजतारांचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घुईखेड येथे घडली. घुईखेड शिवारातून गौण खनिजाची मांजरखेड (दानापूर) मार्गे ट्रकने ने-आण केली जाते. शनिवारी दुपारी आरजे १९ जीडी १४७० क्रमांकाचा टिप्पर मुरूम खाली करून परत येत असताना अचानक तारांचा स्पर्श झाला. भर उन्हात टिप्परने थेट पेट घेतला.चालक कालुराम याने कसाबसा जीव वाचविला. टिप्पर काही मिनिटामध्येच जळून खाक झाला. सदर ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असून, राजस्थानातील आहे.खानापुरात पाच घरे बेचिराखमोर्शी : लगतच्या खानापूर येथे लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्पार्किंग झाल्यानंतर गवारीपुरा भागातील रहिवासी बाळू शेंद्रे, गजानन शेंद्रे, अंजनाबाई वाघाडे, दिगंबर शेंद्रे, दिवाकर चौधरी यांची घरे आगीने कवेत घेतली. श्रीनाथ महाराज यांनी मोर्शी येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. मोर्शीचे तहसीलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्तांचे सांत्वन केले. आग विझविण्यासाठी अशोक निमजे, संदीप भदाडे, प्रदीप उमाळे, श्रीकृष्ण ढाकूलकर इत्यादींनी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोलीस पाटील, तलाठी व खानापूरवासीयांनी मदत केली.

टॅग्स :fireआग