परसोड्यात बिबट्याने पाडला गाईचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:23+5:302021-02-27T04:15:23+5:30

पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पोहरा वतुर्ळातील परसोडा बीट वनखंड क्रमांक ७७ या परिसरातील परसोडा येथील ...

In the afternoon, a leopard knocked down a cow | परसोड्यात बिबट्याने पाडला गाईचा फडशा

परसोड्यात बिबट्याने पाडला गाईचा फडशा

पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पोहरा वतुर्ळातील परसोडा बीट वनखंड क्रमांक ७७ या परिसरातील परसोडा येथील बशीर शेख (रा. परसोडा) यांच्या मालकीची गीर जातीची एक मोठी गाय बिबट्याने गोठ्यात घुसून ठार केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

गावातील काही नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनाखाली परसोडा बीटचे वनरक्षक प्रदीप आखरे यांनी घटनास्थळ गाठून पशुमालकांशी चर्चा केली व घटनास्थळी पंचनामा केला. गाईच्या अंगावर बिबट्याच्या नखाचे ओरखडे दिसून आल्याने बिबट्यानेच शिकार केल्याचे वनविभााने स्पष्ट केले. पशुमालकांनी वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर केला आहे.

--------

Web Title: In the afternoon, a leopard knocked down a cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.