विवाहितेच्या मृत्यूनंतर सासर, माहेरच्या मंडळीत हाणामारी

By Admin | Updated: September 27, 2015 00:10 IST2015-09-27T00:10:50+5:302015-09-27T00:10:50+5:30

विवाहितेच्या मृत्यूनंतर सासर व माहेरच्या मंडळीत हाणामारी झाल्याची घटना मायानगरात घडली.

After the death of a husband, a pandemonium in the mother-in-law congregation | विवाहितेच्या मृत्यूनंतर सासर, माहेरच्या मंडळीत हाणामारी

विवाहितेच्या मृत्यूनंतर सासर, माहेरच्या मंडळीत हाणामारी

मायानगरातील घटना : शवविच्छेदन अहवालानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये समेट
अमरावती : विवाहितेच्या मृत्यूनंतर सासर व माहेरच्या मंडळीत हाणामारी झाल्याची घटना मायानगरात घडली. रुपाली दिनेश डगवार (३०) असे मृताचे नाव असून मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच दोन्ही कुटुंबीयांमध्ये समेट घडून आला आहे.
शुक्रवारी दुपारी रुपाली डगवार हिचा कुलरच्या विद्युत प्रवाहाने मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या पतीने राजापेठ पोलीस ठाण्यात दिली होती. ही बाब रुपालीचे माहेरवासींना माहिती होताच ते पुण्यावरून अमरावतीत धडकले.

तणाव, वाहनांची तोडफोड
अमरावती : शनिवारी सकाळी ७ वाजता त्यांनी थेट रुपालीचे घर गाठून मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत पती दिनेशला जाब विचारला. रुपालीची हत्या करण्यात आल्याचा आरोप पती दिनेशने फेटाळला. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारी सुरू झाली. यामध्ये रुपालीच्या माहेरवासीयांचे एक चारचाकी वाहनाचीसुध्दा तोडफोड करण्यात आले.
या हाणामारी रुपालीचे वडील रमेश गुजर (६०), आई यमुना गुजर, भाऊ स्वामी गुजर (२९) व मामा अनिल घांमदे यांच्यासह दोन ते तीन नातेवाईक जखमी झाले. ही हाणामारी सुरू असताना मायानगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही कुटुंबीयांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन एकमेकांविरुध्द तक्रार करण्याचा प्रयत्न सुरू केले होता. यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुुंबीयांतील १०० ते २०० नागरिक जमले होते. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक कळमकर यांनाही पाचारण केले. तणावाची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी राजापेठ पोलिसांना योग्य ते निर्देश दिले. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात रुपालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाची प्रतीक्षा दोन्ही कुटुंबीय करीत होते. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांमधील वाद काही वेळापुरता शांत झाला होता. दुपारी रुपालीचे शवविच्छेदन राजापेठ पोलिसांना प्राप्त होताच दोन्ही कुटुंबीयांमधील गैरसमज दूर झाले आणि त्यांच्यात समेट घडून आला. मात्र, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

रुपालीच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात श्वासोश्वास बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही बाब नातेवाईकांना सांगण्यात आल्यावर दोन्ही कुटुंबीयांचा गैरसमज दूर झाला. त्यामुळे आता आम्हाला तक्रार करायची नाही, असे दोन्ही कुटुंबीयांनी लिहून दिले आहे.
- एस.एस. भगत,
पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

श्वासोच्छश्वास बंद पडल्याने रुपालीचा मृत्यू
दुपारी २ ते ३ वाजतादरम्यान इर्विनमध्ये रुपालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रुपालीचा श्वासोच्छश्वास बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल इर्विनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार एस.एस. भगत यांनी दिली.

Web Title: After the death of a husband, a pandemonium in the mother-in-law congregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.