अलकेशच्या मृत्यूनंतर महापालिका शाळेची दुर्दशा उघड

By Admin | Updated: October 7, 2015 01:30 IST2015-10-07T01:30:06+5:302015-10-07T01:30:06+5:30

विलासनगरातील महापालिका मराठी शाळा क्रमांक १७ मधील दुर्दशा अलकेश दुर्देवी मृत्यूनंतर उघड झाली.

After the death of Alkesh, the plight of the municipal school is unclear | अलकेशच्या मृत्यूनंतर महापालिका शाळेची दुर्दशा उघड

अलकेशच्या मृत्यूनंतर महापालिका शाळेची दुर्दशा उघड

घाणीच्या साम्राज्याने वरांहाचा मुक्त संचार : महापालिका शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
लोकमत विशेष
अमरावती : विलासनगरातील महापालिका मराठी शाळा क्रमांक १७ मधील दुर्दशा अलकेश दुर्देवी मृत्यूनंतर उघड झाली. शाळेची इमारती जीर्ण अवस्थेत असून तेथे अस्वच्छतेचे भांडार आहे. अशा स्थितीमध्ये शाळकरी चिमुकले महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेताना दिसून येत आहेत.
अलकेश मोहोड गरीब परिस्थीती मोठा झाला असून तो महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. अलकेशने रागाच्या भरात शाळेच्या आवारातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक चिमुकल्यांचे मने सुन्न झाली आहे. त्यातच शाळेची जीर्ण इमारत व शाळेत अस्वच्छतेमध्येच चिमुकले मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारात शौच व घाणीचे साम्राज्य आहे. दुरून शाळा जरी भव्य दिव्य दिसत असली तरी, आत प्रवेश करताच भयावह स्थिती दिसून येत आहे. ज्या ठिकाणी अलकेश मोहोडने आत्महत्या केली. ती जागा अत्यंत अडगळीची आहे. जणु गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील स्वच्छता करण्यात आली नाही. शाळा व्यवस्थापनाकडून शाळेच्या प्रत्येक सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अकलेश हा शाळेच्या भितींवरून आवारात गेला व त्यानंतर त्यांने अडगळीच्या ठिकाणी जावून गळफास लावला. असा कयास शाळेने काढला आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतर आता महापालिकेच्या शिक्षण विभागाला जाग आला असून आता आत्महत्येच्या चौकशीसोबतच शाळेचेही चौकशी सुरु होणार आहे. (प्रतिनिधी)

शिक्षणाधिकारी म्हणतात, शाळेकडे लक्ष देण्यास आम्हीच कमी पडलो
शाळेत विद्यार्थ्याची आत्महत्या झाली. मात्र, शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे यांनी घटनास्थळाची उशिरा पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता शाळेतील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. तसेच शाळेच्या भिंतीवरून नागरिक आत प्रवेश करून गैरप्रकारही करीत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. वराहांच्या मुक्त संचार व अस्वच्छतेबाबत पुढे चौकस राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुला-मुलींसाठी एकच प्रसाधनगृह
शाळा परिसर अस्वच्छतेने वेढला असून तेथील आवारात कचरा व घाण आढळून आली आहे. या शाळेत मुलेमुली एकत्र शिक्षण घेत असून मुलींसाठी प्रसाधनगृहाची वेगळी सोय नसल्याचेही दिसून येत आहे. तसेच प्रसाधनगृहाला दारे नसून आतील भिंती पडक्या अवस्थेत आहेत. त्यातच शाळेच्या शेवटच्या भागात असणारी नाली घाण पाण्याने तुबंल्या असून ते घाण पाणी बाहेर जाण्यासाठी भिंत तोंडून मार्ग बनविण्यात आला आहे. त्यामुळे वराह व श्वानाचा मुक्तसंचार शाळेत आहे. शौचालय व प्रसाधनगृहाच्या भिंतीसुध्दा पडण्याच्या स्थितीत आहेत.

महापालिकेच्या १७ क्रमांकाच्या शाळेत आतापर्यंत ४८ चोऱ्या
महापालिका शाळेच्या आवारातील शेवटी भिंत ओलांडून अनेक नागरिक व विद्यार्थी शाळेत प्रवेश करतात. ही बाब दिवसांही पाहायला मिळते. त्यातच रात्रीचे गैरप्रकार शाळेच्या आवारात होत असल्याची माहिती घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तुवरून लक्षात येते. अशा परिस्थितीमुळे शाळेत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. आतापर्यंत शाळेमध्ये ४८ चोऱ्या घडल्याची माहिती नगरसेवक प्रदिप दंदे यांनी दिली. शाळेच्या बाजूलाच सर्व शिक्षण अभियानाचे पडझड झालेले कार्यालय आहे. त्या इमारतीची दारे व खिडकी सुध्दा नागरिकांनी चोरून नेल्या आहेत.

नगरसेवक प्रदीप दंदेंनी व्यक्त केली खंत
विलासनगरातील नगरसेवक प्रदीप दंदे यांच्यासह शहर सुधार समितीचे भूषण बन्सोड यांनी महापालिका शाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. शाळेतील दुर्दशा पाहून त्यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी शाळेचा विकास करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत.मात्र, शिक्षण विभागाच लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शाळेच्या आवारात पत्ते अन् दारु पार्टीही
शाळेत रात्रीचे गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. शाळेचे मुख्यद्वार लोंखडी आहे. मात्र, शाळेची मागील भिंत ओलांडून नागरिक व विद्यार्थी आत प्रवेश करताना आढळून आले आहे. रात्रीचा शाळेत प्रवेश करून आतील आवारात गैरप्रकार होत असल्याचे घटनास्थळी आढळलेल्या वस्तुवर दिसून येत आहेत. पत्ते, दारू पार्टी व अन्य काही प्रकारही रात्रीच्या वेळेस शाळेत होत असल्याचे दिसून येत आहे. शाळे शेजारी असणाऱ्या दोन रिकाम्या खोल्यामध्येही गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.

शाळेच्या आवारात वराहांचा मुक्तसंचार
मराठी शाळा क्रमांक १७ च्या आवारात वराहांचा मुक्त संचार आहे. त्याशेजारीच शाळा क्रमांक १७ असून दोन्ही शाळेच्या दरम्यान १० फुटांची जागा मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत वराह वास्तव करतात. शाळेलगत असणाऱ्या या जागेत दोन पडक्या खोल्यासुध्दा आहेत. त्या खोल्याशेजारी असणाऱ्या झाडाला अकलेशने गळफास घेतला.

Web Title: After the death of Alkesh, the plight of the municipal school is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.