शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता ‘झिका व्हायरस’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 05:00 IST

झिका हा विषाणू फलॅव्हीव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. याच डासांपासून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराचा प्रसार होतो. झिका आजारावर कोणतेच विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अलर्ट, फवारणी वाढविण्याचे आदेश, डासांच्या पैदास केंद्रांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा ग्राफ माघारत नाही तोच आता ‘झिका’ व्हायरसचा अलर्ट आरोग्य यंत्रणेने दिला आहे. देशात या आजाराच्या काही रुग्णांची नोंद झाल्यामुळे आरोग्य विभागाद्वारा जिल्ह्यात फवारणीसह डासांच्या उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.झिका हा विषाणू फलॅव्हीव्हायरस या प्रजातीमधला असून, हा एडीस डासांमार्फत  पसरतो. राष्ट्रीय रोगनिदान संस्था (नवी दिल्ली) व राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (पुणे) येथे येथे या आजाराचे निदानाची मोफत सुविधा आहे. डेंग्यूप्रमाणेच या आजाराच्या संशयित रुग्णांचे रक्त/ रक्तजल हे २ ते ८ अंश तापमानात शीतशृंखला अबाधित ठेवून तपासणीला पाठवावे लागतात.केरळमध्ये या आजाराच्या १३ रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. डेंग्यूप्रमाणेच या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात घरालगत स्वच्छता ठेवण्याचे व कुठेही पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. डासांची उत्पत्ती होत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.नियमित सर्वेक्षणात दर हजार लोकसंख्येत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात जलद ताप सर्वेक्षण करून  रुग्णांना योग्य तो औषधोपचार द्यावा व संशयित पाच टक्के रुग्णांचे रक्तजल नमुने एनआयव्हीला पाठविण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अधिनस्त आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. 

‘झिका’ कशामुळे होतो?झिका हा विषाणू फलॅव्हीव्हायरस या प्रजातीमधला असून हा एडीस डासांमार्फत पसरतो. याच डासांपासून डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराचा प्रसार होतो. झिका आजारावर कोणतेच विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

एडीस या डासापासून होणारा झिका आजार आहे. किंबहुना डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्यता आहे. अद्याप आपल्याकडे या आजाराच्या रुग्णाची नोंद नाही. आनुषंगिक धूरळणी, फवारणी सुरू आहे.  - डॉ. विशाळ काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

या आहेत उपाययोजना  या आजारावर विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. रुग्णांच्या लक्षणांवरून उपचार केला जातो. यामध्ये रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करावे. घराच्या परिसरात डासांचा पैदास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आवश्यक ती फवारणी करावी. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. मच्छरदानी वापरावी.

ही आहेत लक्षणेया आजाराचा अधिशयन कालावधी निश्चित नाही.लक्षणे सर्वसाधारण डेंग्यू आजाराप्रमाणे आहेत.आजारामुळे रुग्णाला ताप येतो व अंगावर रॅश उमटतात.डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा व डोकेदुखी सौम्य स्वरूपाची क्षणे दिसतात, ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.

 

टॅग्स :Zika Virusझिका वायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या