शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतर म्हणाला; त्याला सोड, माझ्याशी लग्न कर!

By प्रदीप भाकरे | Updated: April 6, 2023 18:28 IST

जीवे मारण्याची धमकी : तरूणीच्या घरापर्यंत पाठलाग

अमरावती : ब्रेकअप अन् प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर देखील बॅकफुटवर न येता एका सडकसख्याहरीने पुर्वप्रेयसीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. तर, लग्न कर, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ४ एप्रिल रोजी रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी अजिंक्य विठ्ठलराव जगताप व धम्मपाल सवई (दोघेही रा. यवतमाळ) यांच्याविरूध्द विनयभंग, धमकी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

अमरावती येथे खासगी नोकरी करणाऱ्या एका तरूणीची सन २०२१ मध्ये अजिंक्य जगताप याच्यासोबत ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध देखील बहरले. मात्र, काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. दरम्यान तिचे लग्न झाल्यावर तिने अजिंक्यला मॅसेज करू नकोस, बोलू नकोस, असे समजावून सांगितले. काही दिवस तो शांत राहिला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्याने तिचा पाठलाग सुरू केला. वारंवार फोन करुन तो जबरदस्तीने लग्न करण्याचे धमक्या देऊ लागल्याने तिने यापुर्वी त्याच्याविरोधात गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास ती तिच्या मैत्रिणीसह मोपेडने नवसारी चौकातून घरी जात असतांना अजिंक्य जगताप व धम्मपाल सवई हे दोघे पाठलाग करत तिच्या खोलीपर्यंत पोहोचले. तिच्या खोलीसमोर दुचाकी थांबवून त्याने वाकून पाहले व तेथून निघून गेला. ती बाब तिला तिच्या घरमालकाच्या मुलीने सांगितली.दिवसभर कॉल, मेसेज

दरम्यान त्याने दिवसभर तिला अनेक कॉल केले. टेक्स मॅसेज केले. परंतु तिने त्यावर रिप्लाय दिला नाही. पाणी डोक्यावरून गेल्याने तिने त्याला कॉल करून जाब विचारला. माझ्या रुमभोवती चकरा का मारतो, असे विचारताच त्याने तिला अश्लिल शिविगाळ केली. तथा माझ्यासोबत लग्न केले नाही, तर तुला जिवाने मारुन टाकेल अशी धमकी दिली. दिवसभराच्या त्या घटनाक्रमामुळे ती प्रचंड भेदरली. तिने ४ एप्रिल रोजी उशिरा रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती