सरसंघचालकांच्या आगमनानंतर प्रांत शिबिराला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:02 IST2019-01-19T23:01:46+5:302019-01-19T23:02:20+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर प्रारंभ झाला. ते २० जानेवारीपर्यंत शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचले.

सरसंघचालकांच्या आगमनानंतर प्रांत शिबिराला प्रारंभ
श्यामकांत सहस्त्रभोजने।
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर प्रारंभ झाला. ते २० जानेवारीपर्यंत शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.
शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचले. त्यांचा ताफा थेट गुरुकुंजनगरात पोहोचला. त्यानंतर ७ वाजता ५ हजार शिबिरार्थी बौद्धिक कक्षात एकत्र आले. त्याठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आगमनानंतर विदर्भ प्रांत शिबिराला सुरुवात झाली. तीन दिवसीय शिबिरात सरसंघचालक शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत सहकार्यवाह भागय्याजी, अखिल भारतीय व्यवस्थाप्रमुख मंगेश भेंडे, सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे व अन्य क्षेत्रीय अधिकारी उपस्थित आहेत.
शिबिरस्थळी सरसंघाचालक स्वागत समितीतील शिबिरात मुक्कामी असल्याने परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. येथे पोहचण्यापूर्वी सरसंघचालकांनी विदर्भ प्रांत संघचालक दिवंगत दादाराव भडके यांच्या कुटुंबीयांची सांत्वना भेट घेतली.
शिबिरस्थळी सहसरकार्यवाह भागय्याजी, विदर्भप्रांत संघचालक राम हरकरे, चंद्रशेखर राठी यांनी स्वयंसेवकांना जुजबी माहिती देऊन पहिल्या सत्राचा शेवट केला.
सरसंघचालकांचा एकही जाहीर कार्यक्रम नाही
सरसंघचालक मोहन भागवतांचा शिबिरस्थळी एकही जाहीर कार्यक्रम नसून, ते केवळ शिबिरातील सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरस्थळी सरसंघचालक पूर्णवेळ उपस्थित असल्याने शहरवासीयांना त्यांच्या जाहीर कार्यक्रमाची उत्सुकता होती. शिबिरस्थळी झालेल्या पत्रपरिषदेतसुद्धा त्यांच्या जाहीर कार्यक्रमाविषयी संघ पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले तेव्हा कुठला जाहीर कार्यक्रम नसल्याचे सांगण्यात आले.