अखेर दुष्काळाचे १०९ कोटी मिळणार

By Admin | Updated: December 24, 2016 01:39 IST2016-12-24T01:39:23+5:302016-12-24T01:39:23+5:30

गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च

After all, the drought will get Rs 109 crore | अखेर दुष्काळाचे १०९ कोटी मिळणार

अखेर दुष्काळाचे १०९ कोटी मिळणार

चार आठवड्यांत रक्कम देणार : विभागीय आयुक्तांचे शपथपत्र
गजानन मोहोड ल्ल अमरावती
गतवर्षीच्या दुष्काळाचा सरसकट निधी न देता जाहीर पीकविम्याच्या ५० टक्के निधी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर राज्य शासनाने २ मार्च २०१५ ला घेतला होता. मात्र, अद्याप निधी दिला नसल्याने न्यायालयाने पुन्हा शासनाला फटकारले असता चार आठवड्याच्या आत निधी देण्याचे शासनाने मान्य केले. त्यानुसार फेब्रुवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ८६९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार रुपयांची मदत मिळण्याची आशा आहे.
गतवर्षी शासनाने दुष्काळी जिल्ह्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नव्हता. तसेच एनडीआरच्या निर्णयानंतर मदत दिली नाही. याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायलायाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.
यावर शासनाने ५० पैशाच्या आत पैसेवारी असणाऱ्या विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली.

अशी मिळणार सोयाबीनसाठी मदत
४पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात जिल्ह्यात १०९३६.५९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये अमरावती १३१९.८५ लाख, भातकुली १३०५.४४, नांदगाव १७५४.६८, धामणगाव ८६०.७४, चांदूररेल्वे ११९१.७८, तिवसा ७०८४.६६, मोर्शी ७९१७.२८, वरुड ३७.९५, चांदूरबाजार २१४१.०३, अचलपूर ४०८५०२, दर्यापूर ४२१.४०, अंजनगाव ६०१.४०, अंजनगाव ६०१.१०, धारणी ७६९.९७ व चिखलदरा तालुक्यात ५१३.५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

कपाशीसाठी
३९ कोटी मिळणार
४कपाशीपिकासाठी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात पीकविम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत मिळणार आहे. यामध्ये दर्यापुरात एक हजार ७११ शेतकऱ्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपये अशी एकूण १८४८ शेतकऱ्यांना ३९ कोटी ४४ हजार १८१ रुपये मदत दिली जाईल.

Web Title: After all, the drought will get Rs 109 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.