२० दिवसांनंतर बाजार समितीचे कामकाज सुरू

By Admin | Updated: July 27, 2016 00:12 IST2016-07-27T00:12:52+5:302016-07-27T00:12:52+5:30

शासनाने शेतकऱ्यांकडून अडत न घेता ते खरेदीदारांकडून वसूल करावे,....

After 20 days the market committee's work is going on | २० दिवसांनंतर बाजार समितीचे कामकाज सुरू

२० दिवसांनंतर बाजार समितीचे कामकाज सुरू

अडते असोशिएशनचा पुढाकार : अध्यादेशानुसार खरेदीदारांकडून होणार अडत वसूल
अमरावती : शासनाने शेतकऱ्यांकडून अडत न घेता ते खरेदीदारांकडून वसूल करावे, असा नवा नियम लागू केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी येथील बाजार समितीत कामकाज सुरू झाले. हर्रासीनंतर खरेदीदारांकडून अडत वसूल करून शासन अध्यादेशाचे पालन करण्यात आले.
२० दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीत खुली हर्रास करून शेतामालाची विक्री करण्यात आली. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून अडत वसूल होणार नाही, ही बाब अडते असोशिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
शासन अध्यादेशाचे पालन करण्याचा निर्णय अडते असोशिएशनने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाची विक्री करून व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्यास प्रारंभ झाला आहे.
त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस आणण्यास काहीही हरकत नाही, असे अडते असोशिएशनने स्पष्ट केले आहे. मंगळवारी शेतमालाची खुली हर्रास करण्यात आली. गहू १७००, तूर ८०५३ तर हरभरा ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकण्यात आला.खुल्या हर्रास प्रक्रियेला व्यापारी मतदार संघाने प्रतिनिधी सतीश अट्टल यांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. २० दिवसांपासून बंद असलेली बाजार समिती सुरू करण्यासाठी अडत असोशिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, धीरज बारबुद्धे, शाम साबळे, सजचन पसारी, दिनेश मुंधडा, सतीश अग्रवाल, मनोज चांडक, प्रवीण भुरे, कमल सारडा, सुरेश बजाज, संतोड परांजपे, राजकिशोर दायमा, दिनेश भारती आदींनी पुकाढार घेतला. (प्रतिनिधी)

‘‘ बाजार समितीचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे. आता शेतकऱ्यांपासून अडत वसूल होणार नाही, असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. शासन अध्यादेशाचे पालन करून अडत ही व्यापाऱ्यांपासून वसूल केली जाईल.
- राजेश पाटील,
अध्यक्ष, अडते असोशिएशन

Web Title: After 20 days the market committee's work is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.