दहावीतील क्रीडापाठोपाठ रेखाकला गुणांवरही गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST2021-04-03T04:12:02+5:302021-04-03T04:12:02+5:30

अमरावती : कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अध्यापन जेमतेम झाले. त्यातच गतवर्षी क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा क्रीडा गुण ...

After the 10th game, there was also a scuffle over drawing points | दहावीतील क्रीडापाठोपाठ रेखाकला गुणांवरही गंडांतर

दहावीतील क्रीडापाठोपाठ रेखाकला गुणांवरही गंडांतर

अमरावती : कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अध्यापन जेमतेम झाले. त्यातच गतवर्षी क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा क्रीडा गुण मिळणार नसल्याचे चित्र आहे. आता रेखाकला परीक्षेचे गुण देण्यात येऊ नये, असे पत्र तंत्रशिक्षण विभागाने काढले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून, ज्यांनी चित्रकलेच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत, त्यांना तरी गुण मिळावे, अशी मागणी कला शिक्षकांमधून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट रेखाकला परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेडनुसार दहावी बोर्ड परीक्षेत गुण दिले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या वर्गातील चित्रकलेची अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार नाहीत. दरम्यान, अनेक विद्यार्थी सातवी आणि आठवीच्या वर्गातच या परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना तरी चित्रकला गुण द्यावे, अशी मागणी कला शिक्षकांमधून होत आहे.

---------------

बॉक्स

ग्रेडनुसार मिळणार गुण

ए- ७ गुण

बी - ५ गुण

सी -३ गुण

बॉक्स

गतवर्षी बोर्डाकडे सादर प्रस्ताव ३३०१

अपात्र झालेले प्रस्ताव २५३

रेखाकला गुण मिळालेले विद्यार्थी ३०४८

कोट

गत दोन वर्षांत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली, त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर केले आहेत. त्यांच्यावर अन्याय न करता रेखाकलेचे गुण देण्यात यावेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

- विनोद इंगोले, कला शिक्षक

----------------

कोट

दरवर्षी चित्रकलेची परीक्षा घेतली जाते. हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. दोन सत्रांत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रतिसाद चांगला असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे परीक्षा झालेल्या नसल्याने गुण न देण्याचा निर्णय झाला. तो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे.

- संजय श्रीखंडे, कलाशिक्षक

--------------

कोट

चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांनी गुणांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. अनेक जण दहावीच्या वर्गात असताना चित्रकलेची अंतिम परीक्षा देणार होते. मात्र, कोरोनामुळे चित्रकला परीक्षा होऊ शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

- कोमल देशमुख, विद्यार्थी

------------

कोट

आम्ही रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. बोर्डात शाळेच्यावतीने प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे गुण देण्यात यावेत. गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. दाेन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त प्रस्तावानुसार गुणदान व्हावे.

- पियू मराठे, विद्यार्थी

Web Title: After the 10th game, there was also a scuffle over drawing points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.