अडसूळ, देवपारे, वानखडे यांची उमेदवारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:17 IST2019-03-25T23:17:00+5:302019-03-25T23:17:29+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह सहा उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ९८ उमेदवारांनी २०५ अर्जांची उचल केलेली आहे. अर्जांची उचल व दाखल करायला मंगळवार डेडलाइन आहे. मंगळवारच्या अखेरच्या चार तासांत उमेदवारांची भाऊगर्दी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

अडसूळ, देवपारे, वानखडे यांची उमेदवारी दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह सहा उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ९८ उमेदवारांनी २०५ अर्जांची उचल केलेली आहे. अर्जांची उचल व दाखल करायला मंगळवार डेडलाइन आहे. मंगळवारच्या अखेरच्या चार तासांत उमेदवारांची भाऊगर्दी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी युतीचे उमेदवार आनंदराव विठोबा अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार डॉ. अनिल बोंडे व मंगला अडसूळ उपस्थित होत्या. अडसुळांनी पहाटे शेगाव येथे संत गजानन महाराज व अमरावतीत अंबा व एकवीरा देवीचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (इर्र्विन) चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून शेकडो शिवसैनिकांसह रॅली काढली. यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबई येथील खासदार अनिल देसाई, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख आमदार विजयराज श्ािंदे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार, माजी आमदार, शिवसेना व भाजपचे जिल्हाप्रमुख, अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित होते. उन्हाचा तडाखा बघता, भाजपचे नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांनी गर्ल्स हायस्कूल चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
भारिप बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाडी) चे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्यासह निशा शेंडे, माजी आमदार हरिभाऊ भदे, एमआयएमचे विदर्भप्रमुख मो. नाझीम, माजी जिल्हाध्यक्ष चरणदास निकासे, पश्चिम जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, नामदेवराव जावरकर, अतुल नळकांडे, विवेक जावरकर, इस्माईलभाई, शालिनी पाटील, माला वानखडे, बी.पी. निशाणे, श्रीकृष्ण बोरखडे, सदानंद नागे, सतीश वानखडे, समीक्षा वानखडे आदी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीचे अरुण वानखडे यांनीदेखील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, अनंत लांजेवार, ऋषी खत्री, राजीव बसवनाथे उपस्थित होते.
यांचीही उमेदवारी
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी संजय हिरामन आठवले (बहुजन महापार्टी), राजू महादेवराव सोनोने ( बहुजन महापार्टी), विनोद गाडे (आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी), विजय विल्हेकर (स्वतंत्र भारत पक्ष), नीलिमा भटकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), नरेंद्र कठाणे ( राष्ट्रीय जनसुरक्षा), संजय आठवले, मीनाक्षी करवाडे, राहुल मोहोड, सिद्धार्थ बनसोड, ज्ञानश्वर मानकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
यांनी नेले अर्ज
गंगा काकणे (रिपाइं सेक्युलर), अंकुश लोखंडे (आरिप), रामचंद्र वानखडे (राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टी), नीलम रंगारकर (भारिप), किरण रहाटे (आरपीआय), नीलिमा भटकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), यांनी सोमवारी राजकीय पक्षांचे नावाने उमेदवारी अर्ज नेले. त्याशिवाय इतर १४ इच्छुकांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज नेले. आतापर्यंत एकूण ९८ जणांनी २०५ अर्ज नेलेत.