अडसूळ, बुंदिले कोट्यधीश उमेदवार
By Admin | Updated: October 6, 2014 23:06 IST2014-10-06T23:06:24+5:302014-10-06T23:06:24+5:30
दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अभिजित अडसूळ आणि भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले करोडपती तर मनसेचे गोपाल चंदन भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे व राष्ट्रवादीचे उमेदवार दिनेश बूब

अडसूळ, बुंदिले कोट्यधीश उमेदवार
दर्यापूर : दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अभिजित अडसूळ आणि भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले करोडपती तर मनसेचे गोपाल चंदन भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे व राष्ट्रवादीचे उमेदवार दिनेश बूब लाखांचे धनी आहेत.
शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे अभिजित अडसूळ यांच्याकडे १ लाख ४५ हजारांची रोकड असून ४४ लाख ३७ हजार १३७ रूपये व पत्नीच्या नावे १८ लाख ५७ हजार ७७२ रुपयांची बँकेत ठेवी आहे. अडसूळ यांची ३ लाख ५३ हजार ७३५ रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक असून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राद्वारे त्यांनी १ कोटी ८२ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. अडसूळ यांचा मुंबई येथील कांदिवली येथे ४७० चौरस फुटाचा फ्लॅट असून वावलेगाव येथे ४ हजार ८८ चौरस फुटांचा प्लॉट आहे.
भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले हेसुद्धा कोट्यधीश आहेत. त्यांच्याजवळ १ कोटी ५ लाख ६७ हजारांची जंगम तर ७८ लाख ८० हजारांची स्थावर मालमत्ता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गोपाल चंदन यांच्याकडे २ लाखांची रोकड असून १६ लाख ४० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे २ लाख ८० हजारांची संपत्ती आहे. चंदन यांच्याकडे १० एकर ३० गुंठे शेती आणि अकोला येथे भूखंड असल्याचे त्यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणात नमूद आहे.
भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे यांच्याकडे ५ लाख रूपये रोख तर पतीजवळ २ लाख ५० हजार रूपये आहेत. त्यांच्याकडे ११ लाख १३ हजार रूपयांचे सोने तर ४३ हजार रूपयांची चांदी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिनेश बूब यांच्याकडे १ लाख २७ हजार ११५ रूपये व पत्नीकडे ५२ हजारांची रोकड आहे. त्याचप्रमाणे बूब यांच्याकडे ३ लाख ५० हजारांचे सोने तर पत्नीकडे ५ लाख ५० हजारांचे सोने आहे. दिनेश बूब यांच्या नावावर ५ लाख ४७ हजार ५५७ तर पत्नीच्या नावावर १ लाख ४४ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.