अल्पवयीन विद्यार्थिनीचे साहस ठरले प्रशंसनीय

By Admin | Updated: September 10, 2016 00:23 IST2016-09-10T00:23:19+5:302016-09-10T00:23:19+5:30

मामाने अपहरण केलेल्या पांढरी खानमपूरच्या विद्यार्थिनीने या संकटातही धीर सोडला नाही.

Admittedly, the courage of a minor girl | अल्पवयीन विद्यार्थिनीचे साहस ठरले प्रशंसनीय

अल्पवयीन विद्यार्थिनीचे साहस ठरले प्रशंसनीय

धैर्य : जंगलात एकटीने काढली रात्र
अंजनगाव सुर्जी : मामाने अपहरण केलेल्या पांढरी खानमपूरच्या विद्यार्थिनीने या संकटातही धीर सोडला नाही. गळ्याला मामाने चाकू लावल्यावर ती बेशुद्ध झाली. मामा घटनास्थळावरून पळून गेला, ती शुद्धीवर आल्यावर अकोलखेड, ता. अकोट या सातपुड्याच्या पायथ्या शेजारच्या शेतात अंधारात एकटीच होती. तिला पाहण्यासाठी पुन्हा तिचा मामा आला व जोरजोराने तिला हाकाही मारल्या. पाण जिवाच्या धाकाने ती दडून बसली. रात्री गावकरी सुद्धा टॉर्च घेऊन शोधताना तिला दिसले पण त्यांची ओळख न पटल्याने व हे मामाचेच साथीदार असल्याचा संशय आल्याने ती कडब्याच्या गंजीत दडून बसली. भयान जंगलात, अंधाऱ्या रात्री या अल्पवयीन विद्यार्थिनीने दाखविलेले साहस प्रशंसनीय आहे.
गावकऱ्यांनी तिला सकाळी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर तिने अकोट पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अंधारातही रात्र काढल्याची प्रेरणा आपणास 'सावधान इंडिया' या मालिकेतून मिळाल्याचे सांगितले.
एक क्षण ओढणीने गळफास घेण्याचा तिने विचारसुद्धा केला. पण संकटात धीर सोडू नका, संकटाचा सामना करा, हे मालिकेतील विचार तिला त्यावेळी प्रेरणादायी ठरले. हा संपूर्ण घटनाक्रम अतिशय नाट्यपूर्ण असून अकोलखेडच्या गावकऱ्यांना मात्र ही संत गजानन महाराजांची कृपा वाटते. याच परिसरात गजानन महाराजांनी अनेक चमत्कार केल्याने हा परिसर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. (प्रतिनिधी)

वसतिगृहाने बसविले नियम धाब्यावर
पांढरीच्या समाजकल्याण वसतिगृहात केवळ एक महिन्याआधी १५ आॅगस्टच्या दिवशी शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या की, आपणास बाहेर जायचे असेल तर फक्त आई-वडिलांसोबत जाता येईल. पण या प्रकरणात विद्यार्थिनीला आई-वडील नसताना का सोडण्यात आले? याचे उत्तर वसतिगृह प्रशासनाजवळ नाही. मुख्याध्यापक प्रवीण जीरापुरे मात्र समर्थन करताना सांगतात की आम्ही मुलीच्या अर्जानुसार तिला सुटी दिली. मात्र प्रकरणात नियमांची सीमा पार पायमल्ली झाल्याचे दिसून येते.

मामाचा इतिहास गुन्हेगारी प्रवृत्तीचा
राजू स. आठवले, रा.पंचशीलनगर अकोला हा विद्यार्थिनीचा मामा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याचेवर अकोला भागात अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे व त्याने कारावासही भोगला आहे. काही दिवस राजू हा पांढरी व अंजनगावातही राहत होता. घटनेचे दिवशी त्याने मित्राला काही वेळासाठी मागवून आणलेली दुचाकी चार दिवसापासून त्याने परत केली नव्हती. पोलिसांनी पकडल्यावर त्याच्या अंगात फक्त पॅन्ट होता व अंतर्वस्त्र गायब होते.

Web Title: Admittedly, the courage of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.