जिल्हा परिषदेत प्रशासकीय कामांची लगबग
By Admin | Updated: September 11, 2014 23:12 IST2014-09-11T23:12:02+5:302014-09-11T23:12:02+5:30
आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहीत लक्षात घेता जिल्हा परिषदेतील विविध विभागातील प्रशासकिय कामाना वेग आला आहे. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे नेहमीपेक्षा

जिल्हा परिषदेत प्रशासकीय कामांची लगबग
आचारसंहितेचा धसका : स्वाक्षरीसाठी फायलींचा ढीग
अमरावती : आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहीत लक्षात घेता जिल्हा परिषदेतील विविध विभागातील प्रशासकिय कामाना वेग आला आहे. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे नेहमीपेक्षा जास्त फाईली येत असल्याने कामाचा वेग वाढल्याचे चित्र दिसुन येत आहे.
जिल्हयाच्या ग्रामविकासाचा केंद्र बिंदु असलेल्या जिल्हापरिषदेत ऐरवी प्रशासकीय कामकाज म्हटले की दप्तर दिंरगाई नित्याची बाब ठरली आहे . या प्रकारामुळे ग्रामिण भागातुन प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या नागरीकांना कामे करण्यासाठी चकरा माराव्या लागतात . आता मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता लक्षात घेता प्रशासकीय कामकाजाला वेग आला आहे . यामध्ये जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग , सिंचन विभाग , पाणी पुरवठा विभाग , आरोग्य , शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंर्वधन,समाज कल्याण , भुजल सर्व्हैक्षण विभाग , वित्त आदी विभागाचा समावेश आहे. विविध विभागातुन येणाऱ्या प्रशासकीय फाईली स्वाक्षरीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयाकडे येतात मात्र आता विधानसभेची निवडणुक तोडावर येताच जिल्हा परिषदेच्या विविध विभागात प्रशासकीय कामाना वेग आल्याचे दिसुन आले अशीची कामाची पध्दत नेहमीसाठी ठेवल्या ठेवल्यास ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरीकांनाही होणारा मनस्ताप दुर होऊन जिल्हा परिषदेच्या कामकाजाप्रती समाधान मिळू शकते. (प्रतिनिधी)