जिल्हा परिषदेत पुरवणी अंदाजपत्रकांची जुळवणी

By Admin | Updated: December 13, 2015 00:11 IST2015-12-13T00:11:54+5:302015-12-13T00:11:54+5:30

राज्य शासनाकडून कर, उपकाराची रक्कम जिल्हा परिषदेला प्राप्त झाली नसल्याने तयारी सुरू असली तरी शासकीय अनुदानाची रक्कम ...

Adjustment of the budget estimates in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत पुरवणी अंदाजपत्रकांची जुळवणी

जिल्हा परिषदेत पुरवणी अंदाजपत्रकांची जुळवणी


अमरावती : राज्य शासनाकडून कर, उपकाराची रक्कम जिल्हा परिषदेला प्राप्त झाली नसल्याने तयारी सुरू असली तरी शासकीय अनुदानाची रक्कम जो पर्यत उपलब्ध होणार नाही तो पर्यत पुरवणी अंदाजपत्रकास अंतिम स्वरूप देता येणार नाही.
दरवर्षी जिल्हा परिषदेला कर व उपकराची रक्कम अदा करते.ही रक्कम उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेत पुरवणी अंदाजपत्रक तयार करून या निधीतून विकास कामे केली जातात. मागील वर्षी जिल्हा परिषदेला शासनाकडून सुमारे ३ कोटी १२ लाख ३४ हजार ६२० रूपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करणयत आले होते मात्र यंदा सन २०१५-१६ या वर्षातील कर उपकराची रक्कम शासनाकडून अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता केवळ एकच वर्षाचा अवधी शिल्लक असल्याने अनेकांना विकास कामाचे वेध लागले आहेत. शेवटचे वर्ष असल्याने बहूतांश जण आपल्या मतदार संघाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी धडपडतो. मात्र राज्य शासनाने अद्यापही जिल्हा परिषदेला कर व उपकराचे अनुदानाची रक्कम उपलब्ध करून न दिल्याने जिल्हा परिषदेत पुरवणी अंदाजपत्रकांची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. जो पर्यत हा अनुदानाचा निधी मिळणार नाही तो पर्यत जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार होऊ शकत नाही. डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात कर व उपकराची रक्कम शासनाकडून अदा केली जाते.

Web Title: Adjustment of the budget estimates in the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.