दर्यापुरात आदिवासी समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 12, 2014 23:30 IST2014-08-12T23:30:42+5:302014-08-12T23:30:42+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेच्या संविधानानुसार कलम ३४२ मध्ये सूचिबध्द झालेल्या व क्षेत्रबंधनात असलेल्या आदिवासी जमातीत धनगर व कुठल्याही गैर आदिवासींना

दर्यापुरात आदिवासी समाजाचा मोर्चा
दर्यापुर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेच्या संविधानानुसार कलम ३४२ मध्ये सूचिबध्द झालेल्या व क्षेत्रबंधनात असलेल्या आदिवासी जमातीत धनगर व कुठल्याही गैर आदिवासींना अनुुसूचित जमातीत समाविष्ट करु नये या मागणीसाठी आदिवासी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौध्द विहार येथून करण्यात आली. हा मोर्चा आकोट मार्ग, गांधी चौक, बसस्थानक मार्गे काढण्यात आला. आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकसमान, जय बिरसा असा असंख्य घोषणा मोर्चात सहभागी झालेले आदिवासी बांधव देत होते. जंगली प्राणी, वराह पकडणारे आदिवासी बांधव विशेष आकर्षण ठरले होते. त्यांनी मोर्चात अक्षरश: जाळे सुध्दा आणले होते.
नगरसेवक प्रकाश चव्हाण, मधुकर चव्हाण, संजय चव्हाण, बाळकृष्ण सोळंके, माजी तहसीलदार मनोहर चव्हाण, ग्रामसेवक दिपक राठोड, राजेश सोळंके, नरेश सोळंके, अरुण चव्हाण, विनायक चव्हाण, गिता चव्हाण या पदाधिकाऱ्यांसह सुुमारे तीन हजार आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणेदार जे.के.पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ट्रॅप्स संघटना, एकता संघटना, नवयुवक आदिवासी आवाज संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पारधी समाज सेवक संघ, मातोश्री पारधी बहुउद्येशिय आदिवासी विकास परिषद, आदिवासी फासे पारधी संघटना दर्यापुर, जगतगुरु नरेंद्राचार्य आदिवासी संघटना विकास संघ अकोला, आदिवासी कर्मचारी संघटना, भारतीय टाकोनकार संघटना, आदिवासी पारधी विकास कल्याण समिती अमरावती यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी )