आदित्यला बनायचंय उद्योगपती

By Admin | Updated: May 26, 2016 01:09 IST2016-05-26T01:09:07+5:302016-05-26T01:09:07+5:30

स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षेत टॉपर ठरलेल्या आदित्य मेहकरेला उद्योगपती व्हायचंय.

Aditya wants to make businessmen | आदित्यला बनायचंय उद्योगपती

आदित्यला बनायचंय उद्योगपती

जिल्ह्यात टॉपर : विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण
अमरावती : स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षेत टॉपर ठरलेल्या आदित्य मेहकरेला उद्योगपती व्हायचंय. आदित्यने विज्ञान शाखेत ६५० पैकी ६२८ (९६.६१ टक्के) गुण प्राप्त करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.
मूळचा अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिवासी आदित्य सुधाकर मेहकरे हा संयुक्त कुटुंबाचा सदस्य आहे. त्याचे वडील कसबेगव्हाण येथे शेती करतात. आई कविता, वडील सुधाकर, मोठा भाऊ मयूर, विजय व पुरुषोत्तम या काकांसोबत तो संयुक्त कुटुंबात राहतो. महाविद्यालयीन शिक्षणासाठी आदित्य अमरावतीच्या बियाणी महाविद्यालयात दाखल झाला. नवाथे नगरात भाड्याच्या खोलीत त्याने अभ्यासाचे धडे गिरविले. आदित्यला पाठबळ देण्यासाठी आईसुध्दा अमरावतीला आली. ग्रामीण भागातून आलेल्या आदित्यला आई-वडिलांचे स्वप्न साकारायचे होते. त्यामुळे अभ्यास आणि केवळ अभ्यासच या सूत्राचा त्याने अवलंब केला आणि त्याने यशोशिखर गाठले. आदित्यने जेईई (जार्इंट एन्ट्रान्स एक्झामिनीशन) या अभ्यासक्रमाला अधिक पसंती दिल्यामुळे सुरुवातीला बारावीच्या अभ्यासाकडे त्याचा कानाडोळा झाला. मात्र, डिसेंबर २०१५ पासून दोन महिने बारावीच्या अभ्यासात वाहून घेतले.

परीक्षा काळात केवळ अभ्यास

अमरावती : दुपारी तीन तास जेईईची कॉलेजमधून आल्यानंतर त्याने बारावीच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. या कालावधीत मित्र मंडळीत रमणाऱ्या आदित्यने स्वत:ला मित्र आणि सोशल मीडियापासून अलिप्त ठेवले. कुठल्याही विषयाची शिकवणी न लावता महाविद्यालयातून मिळालेले मार्गदर्शन आणि पुस्तकातून त्याने लक्ष सुरू ठेवला. बारावीसारख्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर यशोशिखर गाठून आदित्यने ग्रामीण भागातील विद्यार्थीही टॉपर येऊ शकतो, याचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. आदित्यला आयआयटीकडे जायचे आहे. आयआयटी झाल्यानंतर मोठा उद्योगपती होण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. एकाग्रता आणि परिश्रमाला अभ्यासाची जोड दिल्यास यश पदरी पडतेच, असा गुरुमंत्र आदित्यने विद्यार्थ्यांना दिला आहे. सातत्याने अभ्यासात लक्ष दिल्यास शिकवणी वर्गाचीही आवश्यकता नसल्याचे मत आदित्यचे आहे. आदित्यला मोठा उद्योगपती बनून बेरोजगारांसाठी रोजगाराची सोय करायची आहे.

Web Title: Aditya wants to make businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.