अप्पर जिल्हाधिकारी करणार डीपीओंची चौकशी
By Admin | Updated: December 22, 2015 00:21 IST2015-12-22T00:21:30+5:302015-12-22T00:21:30+5:30
वकिलांना उद्धट वागणूक देण्याचा आरोप असलेले जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांची चौकशी आता अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी करणार डीपीओंची चौकशी
अमरावती : वकिलांना उद्धट वागणूक देण्याचा आरोप असलेले जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांची चौकशी आता अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी परदेशी यांच्या नेत्तृत्वातील एक सदस्यीत समितीकडे सोपविली आहे.
वकील संघाच्या ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ५० हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासंदर्भात वकील संघाचे अध्यक्ष नंदकिशोर कलंत्री कार्यकाररिणी सदस्यांसोबत जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांच्याकडे शुक्रवारी गेले होते. मात्र, वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांना काळे यांनी उद्धट वागणूक दिली, असा आरोप वकील संघाचा आहे. यासंदर्भात वकील संघाने निषेध नोंदवून शनिवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
त्यामध्ये काळे यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी वकील संघाने केली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अप्पर जिल्हाअधिकारी खुशालसिंग परदेशी यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे.
परदेशी यांनी काळे यांना लेखी खुलासा मागितला आहे. तसेच हा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा उपस्थित असलेल्यांचे बयाण नोंदविल्या जाणार आहे. याप्रकरणाचा अहवाल सात दिवसांच्या आत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोपविल्या जाईल अशी माहिती परदेशी यांनी दिली. (प्रतिनिधी)