बियाणीचा आदित्य अव्वल

By Admin | Updated: May 26, 2016 01:07 IST2016-05-26T01:07:46+5:302016-05-26T01:07:46+5:30

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला.

Addition of seed to the top | बियाणीचा आदित्य अव्वल

बियाणीचा आदित्य अव्वल

जिल्ह्याचा निकाल ८६.०३ : मुलींचाच वरचष्मा, धामणगाव रेल्वे अव्वल, भातकुली माघारले
अमरावती : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये झालेल्या या परीक्षेत स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य सुधाकर मेहकरे याने ९६.६२ टक्के गुणांसह जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. यंदाच्या निकालावरही ब्रजलाल बियाणीच्या विद्यार्थ्यांचाच वरचष्मा दिसून आला.
याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी शांतीलाल कलंत्री हिने ९६.३१ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून दुसरा तर बियाणीच्याच हार्दिका प्रमोद रहाटे हिने ९६ टक्के गुणांसह जिल्ह्यातून तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. या महाविद्यालयाचा निकाल ९९.१७ टक्के लागला असून जिल्ह्यात या महाविद्यालयाची टक्केवारी सर्वाधिक आहे. शहरातील प्रमुख महाविद्यालयांमधील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा निकाल एकूण ९८.७३ टक्के लागला आहे. तर विद्याभारती महाविद्यालयाने ९३.६३, मणिबाई गुजराती हायस्कूल ९६.१५, गणेशदास राठी कनिष्ठ महाविद्यालय १०० टक्के, केशरबाई लाहोटी महाविद्यालय ९०.५३, समर्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ९७.६५ टक्के, स्वामी सतरामदास ज्युनिअर कॉलेज ९८.६३, गोल्डन किड्स ९५.५२, नूतन कॉलेज ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Web Title: Addition of seed to the top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.