अल्पवयीन विद्यार्थिनींना प्रेमजाळ्यात ओढणारे सक्रिय

By Admin | Updated: July 13, 2016 01:10 IST2016-07-13T01:10:22+5:302016-07-13T01:10:22+5:30

शाळकरी विद्यार्थिनींना आमीष दाखवून प्रेमजाळयात ओढून शोषन करणारे विशिष्ट समाजाचे युवक अचलपुरात सक्रिय झाले आहेत.

Activists coming to love for younger girls are active | अल्पवयीन विद्यार्थिनींना प्रेमजाळ्यात ओढणारे सक्रिय

अल्पवयीन विद्यार्थिनींना प्रेमजाळ्यात ओढणारे सक्रिय

पालक भयभीत : चार महिन्यांत चौथी घटना
सुनील देशपांडे अचलपूर
शाळकरी विद्यार्थिनींना आमीष दाखवून प्रेमजाळयात ओढून शोषन करणारे विशिष्ट समाजाचे युवक अचलपुरात सक्रिय झाले आहेत. चार महिन्यांत चार युवतींबरोबर असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. त्यातील तीन विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने त्या युवकांचे कारस्थान फसून त्यांना जेलची हवा खावी लागली.
येथील चावलमंडी, बुध्देखा चौक, बस स्थानक, खासगी शिकवणीकडे येणारा-जाणारा रस्ता, सुंदर नारायण मंदिराकडे जाणारा मार्ग, शाळा-महाविद्यालयाचे रस्ते व गोरगरिबांच्या वस्त्या हे या युवकांचे कार्यक्षेत्र आहे. गेल्या ३-४ दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना प्रेमजाळयात फसवून पळवून नेण्याचा कट मामाच्या तत्काळ लक्षात आल्याने व पोलिसांच्या मदतीने फसला. यात दोन युवकांना अटकही झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील बिलनपुऱ्यातील दोन अल्पवयीन युवतींना शे.इमरानुद्दीन (१८) व अ. शहजाद, अ.सत्तार (२१) हे पळवून नेत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी भादंवीच्या ३६३ (३४) व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
त्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या घराजवळ इमरोद्दीन व अ.शहजाद साथीदारांसह झकपक कपडे व स्टॉईलने जात होता. तेथे उभे राहून मोबाईलवर सिनेमाचे प्रेमगीत वाजवीत असत. हा प्रकार त्या विद्यार्थिनीच्या मामाच्या लक्षात येताच त्याने त्यांना समज दिली. मात्र काहीच फरक पडला नाही. उलट त्याने साथीदारांसह तेथे दहशतीचे वातावरण निर्माण केले. शेवटी त्या विद्यार्थींनी त्यांच्या प्रेमजाळयात अलगद अडकल्या.
तपासाची चर्के फिरवली व रात्री १० वाजेच्या आत इमरान व शहजाद यांना ताब्यात घेऊन अटक केली. मार्च महिन्यात हिरापुऱ्यातील अल्पवयीन विद्यार्थीनीला फूस लावून फिरोज (रा.किला) याने पळवून नेले होते. १५ दिवसांनी याच भागातील एका अल्पसंख्यांक युवतीला पळवून नेले होते. ही घटना धामणगाव गढी येथे घडल्याने परतवाडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ती विद्यार्थिनी अद्याप परतली नाही, हे उल्लेखनीय.

कारवाईत अडचणी
चार महिन्यांतील चार वेगवेगळया घटनांमधील तीन अल्पवयीन विद्यार्थिनीना पोलिसांनी सुखरुप घरी आणले असले तरी सदर विद्यार्थिनींना फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकांविरुद्ध पोलीस ठाण्यात बोलण्यास त्या तयार नसतात. यामुळे पोलिसांना त्यांचेविरुद्ध कडक कारवाई करण्यास अवघड जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सदर विद्यार्थिनींचा शोध घेऊन त्यांना ठाण्यात विचारपूस करतो. पण त्या भीतीपोटी काही बोलत नाहीत. छेडखानी करणाऱ्याविरुद्ध किंवा मजनुगिरी करणाऱ्याबद्दल आम्ही आता गुप्त माहिती गोळा करू. त्यांना पोलीसी खाक्या दाखवू. विद्यार्थिनींना कुणी छेडत असल्यास त्यांनी थेट पोलीस ठाण्यात बिनधास्त यावे. तक्रार दिल्यास निश्चित कारवाई करू.
- नरेंद्र ठाकरे,
ठाणेदार, अचलपूर ठाणे

 

 

Web Title: Activists coming to love for younger girls are active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.