कोरोना पाॅझिटिव्ह अहवालाव्दारे लाभ मिळविण्याचे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:28+5:302021-02-23T04:20:28+5:30

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटे अहवाल मिळवून ...

Activated the racket to benefit from corona positive reporting | कोरोना पाॅझिटिव्ह अहवालाव्दारे लाभ मिळविण्याचे रॅकेट सक्रिय

कोरोना पाॅझिटिव्ह अहवालाव्दारे लाभ मिळविण्याचे रॅकेट सक्रिय

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटे अहवाल मिळवून देणारे रॅकेट अमरावती शहरात सक्रिय झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी सोमवारी केला. त्यांच्या या आरोपानुसार जिल्हा परिषद अध्यक्षांनी चौकशी करून यासंदर्भात विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओंना झेडपी अध्यक्षांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य प्रकाश साबळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सध्या शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येत आहे. संक्रमिताच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासन हादरले असून, २३ फेब्रुवारीपासून अमरावती, अचलपूर शहरात आठवडाभराचा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या अमरावतीचे नाव देशभर चर्चेत आले आहे. याला हे रॅकेटच कारणीभूत असल्याचा दावा प्रकाश साबळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे झेडपी आमसभेत प्रकाश साबळे यांनी स्वत:चे उदाहरण पुढे करीत मलाच एका डॉक्टरने ‘तुम्हाला पॉझिटिव्ह अहवाल हवा आहे का, अशी ऑफर दिली होती, असे धक्कादायक विधान त्यांनी केले. यामुळे झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सीईओ अमोल येडगे यांना चौकशीचे आदेश दिले. तत्पूर्वी स्वत: बबलू देशमुख यांनीही साबळे यांच्या दाव्याचे अनुमोदन करीत आणखी एका पदाधिकाऱ्यानेदेखील ही बाब लक्षात आणून दिल्याचे सांगत साबळेच्या विधानाला सभागृहात दुजोरा दिला. त्यामुळे चौकशीनंतर यावर काय निष्कर्ष निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Activated the racket to benefit from corona positive reporting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.