शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Amravati | सुसाईड नोट व्हायरलप्रकरणी महिला ‘एसीएफ’वर होणार कारवाई

By गणेश वासनिक | Updated: September 3, 2022 17:50 IST

नागपूर येथील वनबल भवनातून हलली सूत्रे, वरिष्ठांच्या आदेशानुसार लेखी समज देण्याचे निर्देश

अमरावती : स्वत:च सुसाइड नोट व्हायरल करून वनविभागाला बदनाम करणाऱ्या मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत घटांग येथील सहायक वनसंरक्षक व्ही. पी. वसव यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वनबल भवनातून सूत्रे हलली असून, वसव यांना लेखी समज देऊन खुलासा मागविला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच एसीएफ वसव यांची मेळघाटातून बदली अटळ मानली जात आहे. 

सहायक वनसंरक्षक व्ही. पी. वसव यांनी १० एप्रिल २०२२ रोजी सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वरिष्ठ वनाअधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हरिसाल येथील वन परिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे वन विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणातून वन विभाग कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करीत असताना सहायक वनसंरक्षक व्ही. पी. वसव यांनी सोशल मीडियावर सुसाईड नोट व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी वनसंरक्षक जी. के. अनारसे यांच्या अध्यक्षतेत वनवृत्त कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मोईन अहमद, सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार हे समिती सदस्यांनी एसीएफ वसव यांचे बयाण नोंदविले होते. या चौकशी समितीने अहवाल वरिष्ठांकडे पाठविला होता, हे विशेष.सहायक वनसंरक्षक व्ही.पी. वसव यांच्या अफलातून प्रकारामुळे वन खात्याची प्रचंड बदनामी झाली. वसव यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार वसव यांना सुसाइड नोटप्रकरणी लेखी समज दिला जाणार आहे. येत्या काळात बदलीचा देखील प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

-जी.के. अनारसे, मुख्य संरक्षक, प्रादेशिक विभाग अमरावती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागAmravatiअमरावती